संगमेश्वरात पुन्हा मेडिकल फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 01:20 AM2021-12-16T01:20:45+5:302021-12-16T01:21:06+5:30
मालेगाव शहरातील संगमेश्वरात गेल्या आठवड्यात चोरट्यांकडून प्रथमेश मेडिकलमधील चोरी आणि ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा चोरट्यांनी संगमेश्वरकडेच मोर्चा वळविला असून, अमीन हॉस्पिटलचे मेडिकल फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.
मालेगाव : शहरातील संगमेश्वरात गेल्या आठवड्यात चोरट्यांकडून प्रथमेश मेडिकलमधील चोरी आणि ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा चोरट्यांनी संगमेश्वरकडेच मोर्चा वळविला असून, अमीन हॉस्पिटलचे मेडिकल फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.
दोन्ही चोऱ्यांमध्ये चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेले असले तरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्यामुळे संगमेश्वरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, या चोरीत वापरण्यात आलेली कार (एमएच १८ सीझेड ३२८०) ही धुळे महामार्गावर हाॅटेल रेसिडेन्सीच्या मागच्या बाजूस बेवारस स्थितीत आढळून आली. अमळनेर येथील पीयूष चित्ते यांच्या मालकीची ही कार चित्ते यांच्या घरापासून चोरी करून अमळनेर येथे साई मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्समध्येही चोरी केल्याची फिर्याद अमळनेर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. अमळनेर येथे चोरी करून चोरट्यांनी मालेगावकडे मोर्चा वळविला. येथे संगमेश्वरात प्रथमेश मेडिकलमध्ये दीड लाखाची चोरी करून ओम ज्वेलर्समध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील हीच कार वापरण्यात आली होती. त्यांनतर संगमेश्वरातच डॉ. राजेंद्र अमीन यांच्या दवाखान्यातील मेडिकल फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.