युतीतील बंडखोरीवर अखेरपर्यंत नाही उतारा
By श्याम बागुल | Published: October 18, 2019 03:46 PM2019-10-18T15:46:08+5:302019-10-18T15:48:42+5:30
विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशा त-हेने निवडणुकीची तयारी केली होती. भाजप, सेनेत विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी राजकीय तणाव निर्माण झाल्यामुळे दोन्ही पक्षांची युती होणार नाही अशी अटकळ बांधून दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी आपापल्यापरीने मतदार संघाची चाचपणी
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीत युतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष नामांकन दाखल करून बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा नुसता इशारा युतीतील दोन्ही पक्षांनी दिला असला तरी, प्रत्यक्षात मतदानाची वेळ समीप आलेली असताना देखील बंडखोरांवर काही एक कारवाई झालेली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरांमुळे अडचणी वाढल्या आहेत.
विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशा त-हेने निवडणुकीची तयारी केली होती. भाजप, सेनेत विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी राजकीय तणाव निर्माण झाल्यामुळे दोन्ही पक्षांची युती होणार नाही अशी अटकळ बांधून दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी आपापल्यापरीने मतदार संघाची चाचपणी व राजकीय गणिते जुळविण्यास सुरूवात केली होती. यातील काहींना पक्ष श्रेष्ठींनीच उमेदवारीचा शब्द देवून त्यांच्या शिडात हवा भरल्यामुळे इच्छूक जोमाने कामाला लागले. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजप, सेनेची युती होवून दोन्ही पक्षांनी आपापल्या हक्काच्या जागा सोडून घेतल्या. परिणामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी आशा बांधून असलेल्या इच्छूकांचा हिरमोड झाला व त्यांनी नामांकन दाखल करून पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा धरली. यातील काहींची समजूत काढण्यास पक्षश्रेष्ठंींना यश मिळाले तर काहींकडे पक्षानेच दुर्लक्ष करून त्यांच्या बंडखोरीला प्रोत्साहन दिले. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, नाशिक पश्चिम, इगतपुरी या तीन मतदार संघात सेनेने भाजपाविरूद्ध तर भाजपाने सेने विरूद्ध बंडखोरी केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी या संदर्भात पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करून बंडखोरांना समजाविण्याची विनंती केली. पक्षानेही बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बंडखोरांचे बंड शमविले जाईल अशी आशा अधिकृत उमेदवार बाळगून होते. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीचा अखेरचा टप्प्यातील प्रचार संपुष्टात येण्याची वेळ झाली तरी देखील बंडखोरांवर कारवाई होवू शकलेली नाही. उलट पक्षी पक्षांकडून बंडखोरी करून काहीच कारवाई केली गेली नसल्याने पक्ष श्रेष्ठींचा आपल्याला आशिर्वाद आहे असे भासविण्याचा प्रयत्न बंडखोरांकडून केला जात आहे. त्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे अधिकृत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडून होत असलेल्या प्रचाराला तोंड देतांनाच, बंडखोरांचाही सामना करावा लागत आहे. युतीतील दोन्ही पक्षांनी या बंडखोरांबाबत सोयीस्कर मौन पाळले आहे.