ओबीसी आरक्षणाच्या निर्णयापर्यंत शिंपी बांधव काळी फीत बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:06+5:302021-06-28T04:12:06+5:30

नाशिक : शिंपी बांधव सध्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत बिकट परिस्थितीत असून बांधवांना प्रगतीसाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. मात्र सध्या ओबीसी ...

Until the OBC reservation decision, the tailor will tie the black ribbon | ओबीसी आरक्षणाच्या निर्णयापर्यंत शिंपी बांधव काळी फीत बांधणार

ओबीसी आरक्षणाच्या निर्णयापर्यंत शिंपी बांधव काळी फीत बांधणार

Next

नाशिक : शिंपी बांधव सध्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत बिकट परिस्थितीत असून बांधवांना प्रगतीसाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. मात्र सध्या ओबीसी आरक्षणावर गदा येत असून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत सर्व शिंपी बांधव काळी फीत बांधून निषेध नोंदविणार असल्याचा निर्णय ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ मोहिमेअंर्तगत शिंपी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. नाशिक शहरातील तूपसाखरे लॉन्स येथे शिंपी समाज बांधवांची बैठक पार पडली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने हे आरक्षण पूर्ववत करण्यासोबतच ओबीसी जनगणना तसेच इतर न्याय मुद्द्यांवर ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. या बैठकीत विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, समन्वयक योगेश कमोद, नामदेव समाजउन्नती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव तुपसाखरे, अखिल भारतीय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागुल, अरविंद कापसे, कांतीलाल भडांगे, सचिव संजय खैरनार, संदीप खैरनार, ललित कटारे, शांताराम साळवे, सचिन निरगुडे, सचिन बोरसे, आतुल मानकर, अशोक रहाणे, समीर रहाणे, वंदना जगताप, अशोक जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत या लढाईत शिंपी समाज बांधव सक्रियपणे सहभागी होऊन लढा देतील. प्रसंगी आंदोलने, निदर्शने करण्यात शिंपी समाज अग्रभागी सहभागी राहतील. तसेच काम करत असताना सर्व शिंपी बांधव काळ्या फिती लावून काम करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: Until the OBC reservation decision, the tailor will tie the black ribbon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.