कळवणला अवकाळीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 08:59 PM2020-05-14T20:59:43+5:302020-05-14T23:58:09+5:30

कळवण : आधीच कोरोनाचं संकट तालुक्यावर आले असताना अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून थैमान घातल्यामुळे घरांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 Untimely beating to report | कळवणला अवकाळीचा तडाखा

कळवणला अवकाळीचा तडाखा

Next

कळवण : आधीच कोरोनाचं संकट तालुक्यावर आले असताना अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून थैमान घातल्यामुळे घरांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आमदार नितीन पवार यांनी गेल्या बुधवारी खडकी जयदर, करंभेळ (क), देसगाव, शिंगाशी, बंधारपाडा, भौती, मोºयाडुंब, तीळगव्हाण, धनोली, काठरेदिगर व पुनंद खोºयात दौरा करून नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली असून, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकासधिकारी डी. एम. बहिरम यांच्याशी चर्चा करून नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची सूचना केली आहे.
वादळी वाºयासह पावसामुळे घरांचे व शाळेचे पत्रे उडून घरांची पडझड झाली असून, घरकुलाचे काम सुरू असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतात काढून ठेवलेला कांदा, शेतीपिकांचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आदिवासी पश्चिम पट्ट्यातील विविध भागांत गेल्या दोन दिवस वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खडकी, जयदर परिसरात वादळी वाºयासह अवकाळी पावसाने झोडपल्याने त्यात आदिवासी बांधवाच्या घरांचे पत्रे, कौले उडाले आहेत. जीवनावश्यक वस्तू भिजल्या व भिंती कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. शिवाय शेतीमाल व शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
शिंगाशी, बंधारपाडा, भौती, मोºयाडुंब, तीळगव्हाण, धनोली, काठरेदिगर येथे घरावरील पत्रे उडाल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शिवाय शेतातील कांदा व कांदा चाळीतील कांदा भिजल्यामुळे नुकसान झाले आहे. देसगावच्या शाळेचे नुकसान झाले असून करंभेळ (क) येथे वादळी वाºयामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. धनोली येथे घरकुल कामांचे काम सुरू आहे तेथेदेखील अवकाळी पाऊस व वादळी वाºयाचा फटका बसला आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी बांधव पोपट लांडगे, पंडित लांडगे, बाळू बर्डे, बेबीबाई गांगुर्डे, मन्साराम धुळे, मंजीबाई धुळे, उत्तम धुळे, सुनिल गांगुर्डे, रोहिदास धुळे, उत्तम धुळे, लक्ष्मण धुळे, रतन लांडगे, प्रकाश भोये, चिंतामण भोये यांनी भरपाईची मागणी केली आहे. दरम्यान तलाठी व ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी आदिवासी बांधवांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले असून, नुकसानीचा अहवाल तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
---------------------------------
सुरगाणा शहरात तुरळक पाऊस
सुरगाणा : सुरगाणा शहरात बुधवारी साडेपाच वाजेच्या दरम्यान तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासून येथे पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. धुळीसह जोरदार वारा सुटल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य
दिसून येत होते. धूळ आणि हवा जोरदार सुटल्याने मोठे नुकसान होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली
होती. सुदैवाने कुठेही नुकसान झाले नाही. हा अवकाळी पाऊस फार वेळ पडला नाही, मात्र थोडावेळ सुरू
असलेल्या पावसात बाळगोपाळांनी भिजत मनसोक्त
आनंद लुटला.
---------------------
आदिवासी पश्चिम पट्ट्यातील व पुनंद खोºयातील आदिवासी बांधवांच्या घराचे व शेतमालाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असून, नुकसानभरपाई देऊन आदिवासी बांधवांना दिलासा द्यावा. त्यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे.
- नितीन पवार, आमदार
-------------------------
आमचे घर वादळी वाºयाने पडले आहे. घरातील सर्व वस्तू अवकाळी पावसाने भिजल्या आहेत. १५ ते २० दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. आमचे घर तत्काळ बांधले गेले नाही तर संपूर्ण पावसाळा आम्हाला पावसात उघड्यावर राहावे लागणार आहे. शासनाने घर बांधण्यासाठी तत्काळ मदत द्यावी.
- पोपट लांडगे, आदिवासी शेतकरी

Web Title:  Untimely beating to report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक