अवकाळीने नुकसान; प्रशासन सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:14 AM2021-05-06T04:14:39+5:302021-05-06T04:14:39+5:30

ग्राऊंड रिपोर्ट विजेचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने ...

Untimely damage; Administration sluggish | अवकाळीने नुकसान; प्रशासन सुस्त

अवकाळीने नुकसान; प्रशासन सुस्त

Next

ग्राऊंड रिपोर्ट

विजेचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.

विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यातील अनेक गावे चार दिवसांपासून अंधारात.

किसन काजळे

इगतपुरी : तालुक्यातील पूर्वभागाला वीज, गारपीट, वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कुणीही अधिकारी शेतावर फिरकला नसल्याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.

तालुक्यातील खेड, पिंपळगाव मोर, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, धामणगाव, टाकेद, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव, काचनगाव आदी भागात भाजीपाला पिकांसह अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संबंधित विभागाने अद्यापपर्यंत पाहणी केलेली नाही आणि पंचनामेदेखील केले नसल्याचे येथील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यात गेल्यावर्षी २०२०ला कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. २०१९ला पूरजन्य परिस्थिती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं. या सर्व संकटात हैराण झालेला शेतकरी आता कुठेतरी सावरताना दिसतो आहे. त्यातच चार दिवसांपासून सुरू झालेल्या वीज, वारा, गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटो, कांदे, काकडी, कारले, भोपळे, दोडके आदी भाजीपाला पिकांसह शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गेल्या वर्षापासून पोटच्या मुलासारखं स्वतःच्या पिकांना जपत असलेला शेतकरी या चार दिवसांत पूर्णपणे ढासळला आहे. पावसामुळे तालुक्यातील अनेक गावे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधारात होती. विजेचा कडकडाट, गारपीट, तसेच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, विद्युत पुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या कोलमडून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. या सर्व नुकसानीचे शासनाकडून पंचनामे होणार काय, झालेल्या नुकसानीची भरपाई देणार काय, असा सवाल तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

कोट...

निसर्गाच्या या संकटामुळे हातात आलेले पीक माझ्या हातातून हिरावून घेतले आहे. मी हतबल झालो आहे. दोन ते लाख रुपये खर्च वाया गेला असून, शासनाच्या तुटपुंज्या मदतीने काही फायदा होत नाही. तरीही शासनाने आमच्या शेतकऱ्यांची दखल घेऊन काहीतरी मदत दिल्यास दिलासा मिळेल.

- लहानू गव्हाणे, शेतकरी, कांचनगाव

कोट...

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. आमचा परिवारदेखील या म्हशीच्या दुग्धव्यवसायावर अवलंबून होता. आता त्या कर्ज काढून आणलेल्या म्हशीच वीज पडल्याने गेल्यामुळे आमच्या परिवारावर कुऱ्हाड कोसळली असून, शासनाकडून सदर नुकसानीची भरपाई मिळावी.

- उत्तम यंदे, शेतकरी

कोट..

कोरोनाच्या संकटातून बाहेर निघत नाही तोच अवकाळी पावसाने कर्ज काढून महागडे औषधे, खते, मजूर आदी खर्च करत हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्णत: हतबल झालो असून, अद्यापपर्यंत शासनाच्या वतीने कुठल्याही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने पाहणी केलेली नाही. पंचनामेदेखील केले नसल्याने नुकसानभरपाई मिळेल की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

- पुंजाराम गाढवे, शेतकरी, धामणगाव

फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३

अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या टोमॅटो, काकडी या पिकांसह घरांचे झालेले नुकसान.

===Photopath===

050521\05nsk_13_05052021_13.jpg~050521\05nsk_14_05052021_13.jpg~050521\05nsk_15_05052021_13.jpg

===Caption===

फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३~फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३~फोटो-०५ इगतपुरी फार्मर १/२/३

Web Title: Untimely damage; Administration sluggish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.