बेपत्ता बालिकेची निर्घृण हत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:10 PM2018-06-13T13:10:56+5:302018-06-13T13:10:56+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवळी दुमाला या गावातून गेल्या चौदा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय बालिकेची हत्त्या झाल्याचे उघड झाले असून याबाबत संशयिताने कबुली दिली आहे.या बालिकेवर अतिप्रसंग करताना विरोध केल्याने तिच्या डोक्यात दगड घालून,गळा आवळून हत्त्या केल्याची कबुली संशयितांनी दिल्यावर पोलिसांनी आज या बालिकेचा निर्जनस्थळी पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवळी दुमाला या गावातून गेल्या चौदा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय बालिकेची हत्त्या झाल्याचे उघड झाले असून याबाबत संशयिताने कबुली दिली आहे.या बालिकेवर अतिप्रसंग करताना विरोध केल्याने तिच्या डोक्यात दगड घालून,गळा आवळून हत्त्या केल्याची कबुली संशयितांनी दिल्यावर पोलिसांनी आज या बालिकेचा निर्जनस्थळी पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला. आवळी दुमाला येथील किरण जमधडे ही पाच वर्षीय बालिका गेली चौदा दिवसापासून बेपत्ता झाली होती. याबाबत या बालिकेचे वडील रमेश जमधडे यांनी घोटी पोलीस ठाण्यात माझ्या मुलीचे गोपीनाथ दत्तू जमधडे या संशयित व्यक्तीने अपहरण केले असल्याची तक्र ार दिली होती.यामुळे या बालिकेला शोधण्याचे गंभीर आव्हान घोटी पोलिसांसमोर उभे राहिले होते. या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेवर सोपविली होती. दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने या संशयितास शहापूर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले होते.त्याची सखोल चौकशी केली असता सदर बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता तिने आरडाओरडा केल्याने तिची डोक्यात दगड घालून तसेच गळा आवळून हत्त्या केल्याची तसेच तिचा मृतदेह गावाजवळ एका निर्जनस्थळी असलेल्या नाल्यात पुरले असल्याची कबुली संशयितांनी दिली. यानुसार आज सकाळी तहसीलदार अनिल पुरे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अडसूळ, संदीप हांडगे, नवनाथ गुरूळे, शिवाजी जुंदरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.लचके यांनी संशाियतांनी दाखविलेल्या ठिकाणी शोधमोहीम राबविली. तेथे सदर बेपत्ता बलिकेच्या मृतदेहाचा सांगाडा, कपडे व बांगड्या मिळून आल्या आहेत.
दरम्यान गेली चौदा दिवसापासून बेपत्ता असलेल्या बालिकेची नात्याने चुलता असलेल्या व्यक्तीनेच हत्या केल्याची घटना उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गोपीनाथ जमधडे यास जेरबंद केले आहे. दरम्यान घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या.