इगतपुरी तालुक्यात अवकाळीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 09:52 PM2020-05-17T21:52:34+5:302020-05-17T21:54:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य परिसरात वादळीवाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या पावसामुळे इगतपुरीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य परिसरात वादळीवाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या पावसामुळे इगतपुरीच्या पूर्व भागातील अनेक ठिकाणच्या पिकांचे नुकसान झाले. वादळीवाºयामुळे घरांचे छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या. नांदूरवैद्य-अस्वली रस्त्यावरील वीजवाहिन्या तुटून पडल्याने एका रानडुकराचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात साठवून ठेवलेला जनावरांचा चाराही भिजल्याने नुकसान झाले आहे.
इगतपुरी तालुक्यातील घोटी, उभाडे, बेलगाव तºहाळे, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे वाढत्या दराने जनावरांसाठी आणलेला चारा तसेच चुलीसाठी लागणाºया गोवºया व सरपन भिजले आहे. अचानक पाऊस आल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक भागात छोट्या-मोठ्या नुकसानीच्या घटना घडल्या. वाºयाचा जोर अधिक असल्याने नांदूरवैद्य - अस्वली स्टेशन रस्त्यावरील जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या तुटल्या. या घटनेत शॉक लागून एका रानडुकराचा मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा महावितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. घोटीजवळील बेलगाव तºहाळे, उभाडे, दौंडत, घोटी आदी भागात अनेक शेतकºयांच्या पिकांची हानी झाली आहे़सकाळपासूनच वीजपुरवठ्याचा गोंधळ सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाचे निमित्त होत पुन्हा वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला. या पावसामुळे शेतकरी सावध झाला आहे. मान्सूनपूर्व कामांना वेग आल्याचे चित्र पहावयास मिळाले. महावितरणने मान्सूनपूर्व कामे शीघ्र गतीने करणे गरजेचे आहे. अतिजीर्ण झालेल्या वीजवाहिन्या, विद्युतखांबांना अडथळा निर्माण करणारी झाडेझुडपांची छाटणी करावी. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहील, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.