राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:59 PM2019-02-13T17:59:11+5:302019-02-13T18:07:38+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील अडसरे बु.येथे बुधवारी (दि.१३) आदिवासी क्र ांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील अडसरे बु.येथे बुधवारी (दि.१३) आदिवासी क्र ांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
सकाळी ९ वा.पासून राघोजी भांगरे यांच्या मूर्तीची रथात शोभायात्रा सर्वतिर्थ टाकेद येथुन काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. महिलांनी अंगणात सडा-रांगोळी काढण्यात आली होती. विविध प्रकारच्या वेगवेगळ्या कलापथकांनी मिरवणुकीदरम्यान नृत्य व गीते सादर केली. त्यानंतर अडसरे येथे आदिवासी समाजाचे आदिवासी रत्न राष्ट्रपती पुरस्कार विजेते ठकाबाबा गांगड यांना श्रद्धांजली वाहुन कार्यक्र माची सुरुवात करण्यात आली. क्र ातिवीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आलेल्या पाहुण्यांना राघोजी भांगरे यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
गावातील आदिवासी युवा संघ अडसरे बु.चे सागर साबळे, शिवाजी तातळे, प्रथमेश मुंडे, भरत साबळे, निकेत मुंडे, नकर गोडे, प्रमोद गोडे, नंदु मदगे, नवनाथ साबळे, तुकाराम कुंदे, दशरथ कुंदे, सोमनाथ साबळे, सदाशिव साबळे, नामदेव साबळे, रमेश मेमाणे, जनार्धन साबळे, काशिनाथ साबळे, संतोष साबळे, संजय साबळे, शिवाजी चौरे या आदिवासी तरु णांनी राघोजी भांगरे यांचा पुतळा बनवून अडसरे बु. गावात स्मारक उभारले.
आदिवासी बांधवांनी आद्य क्र ांतिकारक राघोजी भांगरे यांच्या कार्याची प्रेरणा घेतल्यास जीवनाला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन कार्यक्र माचे उद्घाटक ढवळा ढेंगळे यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील अडसरे बु गावात आदिवासी युवकांनी एकत्र येत आद्य क्र ांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारण्यात आल्याचा आनंद होत असल्याचे प्रमुख पाहुणे सोमनाथ कातडे यांनी सांगितले.
यावेळी चौथी मधील विद्यार्थी रु द्रा खेताडे याने राघोजी भांगरे यांचा इतिहास सांगितला. तर नवसु खोरगडे, शरद टिपे, जालींदर कातडे, सुनुषा बांगर यांनी गीतांचे सादरीकरण केले.
यावेळी जि. प. सदस्य हरीदास लोहकरे, पं. स. सदस्य सोमनाथ जोशी, सिन्नरचे नगराध्यक्ष किरण डगळे, तुकाराम वारघडे, संपत रोंगटे, डॉ.श्रीराम लहामटे, काशिनाथ कोरडे, राजाभाऊ वागळे, रतन बांबळे, बाळा डहाळे, देवराम खेताडे, भास्कर आहेर, यशवंत पारधी, उद्धव रोंगटे, साहेबराव बांबळे, दतु पेढेकर, शरद लहांगे, सरपंच सुशिला साबळे सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचलन भाऊराव रोंगटे यांनी तर आभार दिनकर गोडे यांनी मानले.
आदिवासी क्र ांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास खुप महान आहे,सर्व माङया नवतरु ण बांधवांनी राघोजी भांगरे यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार आचरणात आणावे.अडसरे या ठिकाणी राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावण झाल्याने मनाला खरोखरच आनंद होत आहे.यासाठी पुढाकार घेणा-या सर्व माङया असडरे येथील तरु ण बांधवांचे धन्यवाद..
--हरीदास लोहकरे, जि. प. सदस्य नाशिक.