अवनखेडला कादवा नदीत युवक बेपत्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 11:48 PM2018-08-01T23:48:11+5:302018-08-01T23:55:32+5:30

दिंडोरी : तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीत पोहण्यास गेलेल्या खाजगी कंपनीतील कामगार बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली. मात्र तपास लागू शकला नसल्याने गुरुवारी पुन्हा शोध कार्य राबविले जाणार आहे.

Unwakkad missing youth in river Kadawa | अवनखेडला कादवा नदीत युवक बेपत्ता 

अवनखेडला कादवा नदीत युवक बेपत्ता 

Next
ठळक मुद्देशोध घेण्यासाठी अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम

दिंडोरी : तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीत पोहण्यास गेलेल्या खाजगी कंपनीतील कामगार बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली. मात्र तपास लागू शकला नसल्याने गुरुवारी पुन्हा शोध कार्य राबविले जाणार आहे.
अवनखेड येथील विकास सीताराम निकम (३०) तसेच त्याचा भाऊ व भाचा हे तिघे कादवा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. विकास नदीत पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. ही बाब त्याचा भाऊ बाळा निकम याने बघितल्यावर त्याने आरडाओरड करत विकासला वाचविण्यासाठी नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारली. मात्र तोपर्यंत विकास बेपत्ता झाला होता.
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, सहाय्यक प्रवीण पाडवी आदींनी घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले. अग्निशामक दलाचे जवान पी. आर. पगारे, प्रदीप बोरसे, आर. आर. खरे आदी रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. तहसीलदार बाबासाहेब गाढवे, सरपंच नरेंद्र जाधव, उपसभापती उत्तम जाधव, माजी सभापती भास्कर भगरे, रामदास पाटील, पिंपळगाव केतकीचे उपसरपंच विनोद देशमुख आदी घटनास्थळी उपस्थित होते. विकास याचा अवघ्या दहा महिन्यापूर्वी विवाह झाला होता.

Web Title: Unwakkad missing youth in river Kadawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.