सटाण्यात लवकरच उपजिल्हा रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:35 PM2020-03-03T16:35:36+5:302020-03-03T16:35:54+5:30
दिलीप बोरसे : ग्रामीण रुग्णालयाला मिळणार दर्जा, आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
सटाणा : येथील ग्रामीण रु ग्णालयाला उपजिल्हा रु ग्णालयाचा दर्जा देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली आहे. वाढती रु ग्ण संख्या विचारात घेऊन शासनाने उपजिल्हा रु ग्णालयाला मान्यता द्यावी या मागणीसाठी टोपे यांचेशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या असल्याचेही बोरसे यांनी सांगितले.
ग्रामीण रु ग्णालयात बाह्य रु ग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे .सध्या दररोज साडे तीनशेहून अधिक बाह्य रु ग्ण संख्या आहे .या रु ग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या ,सर्पदंश ,जळीत तसेच या भागातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे अपघाताचे वाढते प्रमाण यामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुविधांच्या बाबतीत ग्रामीण रु ग्णालय अपुरे पडत आहे .परिणामी रु ग्णांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात येते .नाशिकचे शंभर किलोमीटरचे अंतर पाहता वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अनेक रु ग्ण दगावले आहेत . रु ग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी वेळेत आरोग्य सेवा सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण रु ग्णालयाची श्रेणी वाढवून १०० खाटांचे उपजिल्हा रु ग्णालय म्हणून मान्यता द्यावी या मागणीसाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मंगळवारी (दि.३) सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानभवनात भेट घेऊन त्यांना साकडे घातले. यावेळी टोपे यांनी उपजिल्हा रु ग्णालयाचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या.