आॅनलाइन माहिती अद्ययावत करावी - राजाराम माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:16 AM2018-05-13T00:16:44+5:302018-05-13T00:16:44+5:30
महसूल यंत्रणेने आॅनलाइन प्रणालीमधील माहिती तातडीने अद्ययावत करावी तसेच संबंधित कामे पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.
नाशिक : महसूल यंत्रणेने आॅनलाइन प्रणालीमधील माहिती तातडीने अद्ययावत करावी तसेच संबंधित कामे पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त माने यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या इरोनेट, बीएलओ नेट, एनजीएसपी व एनव्हीएसपी आदी प्रणाली १६ मे २०१८ पासून कार्यान्वित होत असून, त्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. त्याची माहितीही माने यांनी जाणून घेतली. ते म्हणाले, निवडणूक यंत्रणेतील मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांपासून ते जिल्हा निवडणूक अधिकाºयांपर्यंत सर्वांसाठी या प्रणाली सहाय्यकारी ठरणार आहेत. त्याच्या माध्यमातून पारदर्शक व प्रभावी कार्य करणे शक्य होईल त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांनी सदरचे तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी डिजिटल इंडिया, भूमिअभिलेख तसेच विविध आॅनलाइन सेवांमधील कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कळवण, चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, देवळा, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांमध्ये चांगली कामगिरी झाल्याचे सांगितले. बैठकीस उपायुक्त रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे, उपजिल्हाधिाकरी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.