शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्ययावत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:37+5:302021-07-14T04:17:37+5:30
दाभाडी : तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसह सेवापुस्तक अद्ययावत करण्याची मागणी करत शिक्षक भारतीतर्फे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे व गटशिक्षणाधिकारी ...
दाभाडी : तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसह सेवापुस्तक अद्ययावत करण्याची मागणी करत शिक्षक भारतीतर्फे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे व गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे यांची भेट घेऊन निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती पुढील प्रश्न तत्काळ निकाली लावण्याबाबतचे आश्वासन घोंगडे यांनी शिष्टमंडळास दिले. तालुकाध्यक्ष नीलेश नहिरे यांनी याबाबत सविस्तर कॅम्प लावून केंद्रनिहाय नियोजन करण्याची मागणी केली असून येत्या १५ दिवसात तसे नियोजन करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. यावेळी विस्तार अधिकारी साहेबराव निकम, प्रशासन अधिकारी संजय पाटे व कार्यालयीन लिपिक उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळात राज्य सरचिटणीस भरत शेलार, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दिघे, विभागीय संपर्क प्रमुख सतीश मांडवडे, जिल्हा सहसचिव सुनील ठाकरे, अशोक शेवाळे, नीलेश नहिरे, भाऊसाहेब कापडणीस, शिवदास निकम, अभिजित देसले, परेश बडगुजर, भीमराव मगरे, कैलास पाटील, मिलिंद पिंगळे, वैजनाथ भारती, वीरेंद्र खडसे सहभागी होते.
-------------
या आहेत मागण्या...
निवड श्रेणी प्रस्ताव अंतिम करून जिल्हा परिषदेला पाठवण्यात यावे, प्रत्येक शिक्षकाला गोपनीय अहवालाची छायांकित प्रत देण्यात यावी, वैद्यकीय प्रतिपूर्तीसह अन्य थकीत देयकांसाठी जिल्हा परिषदेकडे निधी मागणी करण्यात यावी, वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांचा फरक निकाली काढण्यात यावा, मृत डीसीपीएस धारकांचे सानुग्रह अनुदान प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठवण्यात यावे, कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांना विमा कवच संरक्षणाचे प्रस्ताव तयार करून जि. प. ला पाठविण्यात यावे, नवनियुक्त प्रशिक्षण झालेल्या डीसीपीएसधारकांचे प्रशिक्षण पूर्तीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
130721\img-20210712-wa0024.jpg
गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देतांना तालुकाध्यक्ष निलेश नहिरे, सरचिटणीस भाऊसाहेब कापडणीस, कार्याध्यक्ष शिवदास निकम, कोषाध्यक्ष अभिजित देसले, परेश बडगुजर आदी