दापूरला अद्ययावत विलगीकरण कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:34+5:302021-05-05T04:22:34+5:30
खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे युवा नेते ...
खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, सरपंच रमेश आव्हाड, उपसरपंच ललिता आव्हाड आदींसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनेक रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना, कमी प्रमाणात लक्षणे आढळलेल्या रुग्णांना स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यासाठी सर्व सुविधा असलेला विलगीकरण कक्ष उभा करणे गरजेचे होते. उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून सर्व सुविधा असलेला विलगीकरण कक्ष साकारण्यात आला आहे.
इन्फो
ऑक्सीजनची सुविधा
ऑक्सीजनयुक्त बेड असलेला पहिला कक्ष असून त्यात तीन ऑक्सिजनयुक्त बेड्स आहेत. २० खाटा, वीज, पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. कक्षात राहणाऱ्या गरजू व्यक्तींना जेवणाची सुविधाही देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर, आरोग्यसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका या रुग्णांची देखभाल करणार आहेत. गावातील संत निरंकारी मंडळाचे सेवेकरीही मदतीसाठी राहणार आहेत.
फोटो - ०३ सिन्नर दापूर
सिन्नर तालुक्यातील दापूर येथे विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, डॉ. मोहन बच्छाव, दीपक खुळे, जगन्नाथ भाबड, सरपंच रमेश आव्हाड, उपसरपंच ललिता आव्हाड आदी.
===Photopath===
030521\03nsk_29_03052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०३ सिन्नर दापूर सिन्नर तालुक्यातील दापुर येथे विलीगिकरण कक्षाचे उदघाटन प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, डॉ. मोहन बच्छाव, दिपक खुळे, जगन्नाथ भाबड, सरपंच रमेश आव्हाड, उपसरपंच ललिता आव्हाड आदी.