कलेला दाद देणाऱ्यांसोबत आर्थिक पाठबळाचीही गरज उपेंद्र दाते : नम्रता कलाविष्कारतर्फे कलाकारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:54 AM2018-04-07T00:54:25+5:302018-04-07T00:54:25+5:30
नाशिक : कलावंतांच्या क लेला दाद देणाºया रसिकांसोबतच आर्थिक पाठबळ देणाºयांचीही आवश्यकता असते.
नाशिक : कलावंतांच्या क लेला दाद देणाºया रसिकांसोबतच आर्थिक पाठबळ देणाºयांचीही आवश्यकता असते. परंतु, पुरेसे आर्थिक पाठबळ उपलब्ध नसतानाही नाशिकमधील कलावंतांनी रंगभूमिप्रती निष्ठेची परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या प्रयत्नांना निश्चित यश मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त केला आहे. मुंबई नाका परिसरातील भगवंतनगर सामाजिक संस्था सभागृहात शुक्रवारी (दि. ६) नम्रता कलाविष्कार संस्थेतर्फे उपेंद्र दाते यांचा विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर नाट्य दिग्दर्शक रवींद्र ढवळे, संस्थेचे सचिव नंदकुमार देशपांडे उपस्थित होते. यावेळी उपेंद्र दाते यांनी त्यांच्या नाट्यभूमीवरील सुरुवातीच्या काळातील तालीम आणि नाट्यप्रयोगांच्या आठवणींना उजाळा दिला, तर पल्लवी पटवर्धन यांनी ‘प्रयास’ नाटकाच्या निर्मिती व दिग्दर्शनाचे अनुभव कथन केले. दरम्यान, ‘प्रयास’च्या कलाकारांचा तसेच बालनाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. प्र्रास्ताविक नंदकुमार देशपांडे यांनी केले. पूनम पाटील यांनी मानपत्र वाचन केले. राजेश टाकेकर यांनी सूत्रसंचालन केले. कैलास डिडवाणी यांनी आभार मानले.