३८ हजार शेतकऱ्यांनी केली पिकांची माहिती अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:19 AM2021-08-28T04:19:56+5:302021-08-28T04:19:56+5:30

नाशिक: शेतकऱ्यांनी स्वत:च आपल्या पिकांची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंद करावी, यासाठी गेल्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहाणी ...

Upload of crop information by 38,000 farmers | ३८ हजार शेतकऱ्यांनी केली पिकांची माहिती अपलोड

३८ हजार शेतकऱ्यांनी केली पिकांची माहिती अपलोड

Next

नाशिक: शेतकऱ्यांनी स्वत:च आपल्या पिकांची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंद करावी, यासाठी गेल्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहाणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३८,७६१ हजार शेतकऱ्यांनी पीक पेऱ्याची माहिती अपलोड केली आहे. अजूनही ४४,७७२ हजार शेतकरी या दूर असून, त्यांनी तत्काळ ई-पीक नोंद करावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.

गेल्या १५ ऑगस्टला राज्यात ‘ई-पीक पाहणी ॲण्ड्राईड मोबाइल ॲप’चा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. शेतकऱ्यांनी पिकांची माहिती स्वत:च नोंद करून, नोंदणीत होणाऱ्या चुका टाळाव्यात, तसेच यंत्रणेवरील ताणही कमी व्हावा, यासाठी ई-पीक पाहाणी मेाबाईल ॲप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचा त्यात समावेश आहे. तालुक्यात ६६ हजार ९२८ शेतकऱ्यांनी या ॲपवर रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यापैकी ३८ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पीक पेऱ्याची माहिती अपलोड केली आहे. दरम्यान, १५ ऑगस्टला लोकार्पण झाल्यानंतर जिल्ह्यात मागील १२ दिवसांत जवळपास १४ हजार शेतकऱ्यांनी या ॲपवर माहिती अपलोड केली. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार ५३३ शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले असून, ३८ हजार ७६१ शेतकऱ्यांनी पीकपेरा माहिती अपलोड केली आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत माहिती अपलोड करण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतर तलाठी माहिती अपलोड करण्याचे काम करणार आहे.

--इन्फो--

तालुकानिहाय ई-पीकपाणी माहिती अपलोड

दिंडोरी - ३२१५९

बागलाण - २६५

नांदगाव - ३०४

येवला - २२०

सुरगाणा - २४२

पेठ - ४२१

इगतपुरी - ५३३

त्र्यंबक - २५०१

देवळा - १६४

मालेगाव - ५०५

चांदवड - २६८

नाशिक - १५८

निफाड - ४०१

सिन्नर - २२१

कळवण - ३९१

--इन्फो-

काय आहे ई-पीक पाहाणी

या उपक्रमात शेतकऱ्यांना स्वत:च्या पीक पेऱ्याची माहिती स्वत:च नोंद करता येणार आहे. यामुळे होणाऱ्या चुका कमी होण्यास मदत होणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणार असून, शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा उपलब्ध होण्यासदेखील मदत होणार आहे..

Web Title: Upload of crop information by 38,000 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.