गटशिक्षणाधिकाऱ्यांना भेटताच मिळाला शिक्षकांच्या वेतनातील ५ महिन्यांचा फरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:26 PM2019-09-26T22:26:04+5:302019-09-26T22:27:44+5:30
औंदाणे : बागलाण तालुक्यातील सुमारे १ हजार प्राथमिक शिक्षकांचे वेतन आयोगाचा पाच महिन्याचा फरक अद्याप बँकेत जमा न झाल्याने सर्व शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक गटशिक्षणाधिकारी टी. के. घोगंडे व लेखाधिकारी आर. एस. हिरे यांची भेट घेऊन बैठकीत चर्चा करु न त्वरित शिक्षकांच्या खात्यावर फरक देण्यास भाग पाडले याबाबत शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
लोकमत न्युज नेटवर्क

जिल्ह्यातील सर्वतालुका स्तरांवर पाच मिहन्याचा फरक शिक्षकांना कधीच मिळाला असून मात्र बागलाण तालुक्यातील शिक्षक वंचित होते. बागलाण तालुक्यातील शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास आहिरे राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम बधान हे तिन्ही जिल्हाध्यक्ष बागलाण तालुक्यातील असुनही शिक्षक अद्याप फरकाविना होते याबाबत सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी आज शिक्षण विभागाच्या व अकौंटट विभागाच्या प्रमुखाची अचानक भेट घेऊन चर्चा केली असता वेतन आ योगाचा पाच मिहन्याचा फरक का जमा होत : नाही अन्य काही शिक्षकांची वेतन निश्चिती करताना व फरकाची रकमेबाबत एका शिक्षकाला त्या वर्षात नोकरी लागल्यावर फरक जादा तर दुसर्या शिक्षकाला फरक कमी असल्याचे दिसून आल्याने शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी दुरु स्ती करण्याचे सांगितले तसेच शिक्षकांचे पगार एक तारखेला व्हावे मेडिकल बिले गट विमा, फंड प्रकरणे, निकाली काढावे, एल.आयसी हप्ते वेळेवर जात नसल्याने शिक्षकांना भुर्द ड सहन करावा लागत आहे आदी समस्या पदाधिकारीनी मांडल्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी घोगंडे यांनी दिले यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आर.के. खैरनार. देवा पवार, पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास आहिरे शिक्षक समतीचे जिल्हाकार्याध्यक्ष भास्कर मोरे, वामन राव खैरनार, केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेंद्र गायकवाड एम, एस. भामरे, राष्टवादीचे शिक्षक संघटनेचे जिल्हास रचिटणीस प्रकाश सोनवणे शिक्षक भारतीचे निलेश पाटील, सतीश मोरे भिमराव कापडणीस नीतीन भामरे आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते