नाशकात यूपीएससी परीक्षा केंद्र सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:26 AM2018-03-17T01:26:00+5:302018-03-17T01:26:00+5:30
यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा टक्का वाढण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत असून, लवकरच भारतीय प्रशासकीय सेवांच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
नाशिक : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा टक्का वाढण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत असून, लवकरच भारतीय प्रशासकीय सेवांच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. यासंदर्भात विधिमंडळात आमदार जयंत जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले की, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाºया भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाºयांचे प्रमाण वाढावे यासाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणाºया तथापि, अंतिमत: भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड न होणाºया राज्यातील होतकरू व गुणवान उमेदवारांना रोख शिष्यवृत्ती देण्याचा शासनाने माहे एप्रिल २०१६ मध्ये निर्णय घेतलेला आहे. परंतु सन २०१५ मध्ये महाराष्ट्रातील २४ उमेदवारांची यू.पी.एस.सी. अंतिम फेरीसाठी निवड झालेली असतानाही शासनाने जाहीर केलेली शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत त्यांना मिळालेली नाही तसेच भारतीय प्रशासकीय सेवांच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाºया अखिल भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाºयांचे प्रमाण वाढावे यासाठी शासनाने २०१६ मध्ये गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. सदर शिष्यवृत्तीसाठी विहित केलेल्या निकषांमध्ये, मागील तीन वर्षांमध्ये किमान एक वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणाºया तथापि, अंतिमत: भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड न झालेल्या उमेदवारांना सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येऊ शकेल. सदर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दिल्ली येथील निवडक खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाºया उमेदवारांच्या प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क संबंधित संस्थेस शासनाकडून प्रदान केले जाते, तसेच दिल्ली येथील प्रशिक्षण वास्तव्याच्या काला वधीमध्ये रु. १० हजार प्रतिमाह एवढा निर्वाह भत्ता उमेदवारास देण्यात येतो.