नागरी दिन सप्ताहास प्रारंभ
By admin | Published: April 25, 2017 01:12 AM2017-04-25T01:12:17+5:302017-04-25T01:12:31+5:30
त्र्यंबकेश्वर : नगरविकास सप्ताहास आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर : नगरविकास सप्ताहास आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ करण्यात आला. नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
या उपक्रमाला प्रारंभ करताना जिल्हाधिकारी यांनी अपुरे कर्मचारी असताना नागरी दिन साजरा करण्यात जिल्ह्यात पहिल्यांदा सुरुवात केली. शासनाचा नगरविकास विभाग अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा, प्रत्येक कामात लोकसहभाग वाढावा हा या सप्ताहाचा उद्देश आहे. त्यामुळे पालिका कौतुकास पात्र आहे, अशा शब्दांत पालिकेचा गौरव करून कार्यक्षम मुख्याधिकारी व नगरसेवकांचे टीमवर्क हेच कारणीभूत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले.
यावेळी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्र्यंबक नगरपालिकेने या उपक्र मात लोकांचा सहभाग नोंदविला. आपला कारभार लोकाभिमुख केला याबद्दल त्र्यंबक नगरपालिकेचे कौतुक केले. याबरोबरच स्वच्छतेचे महत्त्व परमेश्वराला किती प्रिय असते याबद्दल माहिती दिली.
या औपचारिक कार्यक्रमात धनंजय तुंगार, मुख्याधिकारी आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान,
प्रत्यक्ष सफाई कामाला सुरुवात करण्यात आली. आठवडाभर चालणाऱ्या या सप्ताहात अनेक सेवाभावी संस्था, पालिकेशी संबंधित बचतगट आदींचा सहभाग राहणार आहे. (वार्ताहर)