शहरी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये उत्साह  मात्र मशीनमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:16 AM2019-04-30T01:16:36+5:302019-04-30T01:16:53+5:30

देवळाली विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात सोमवारी दिवसभर मोठ्या उत्साहात उत्स्फूर्तपणे मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाड वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले.

In urban rural areas, enthusiasm among the voters is the failure of the machine | शहरी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये उत्साह  मात्र मशीनमध्ये बिघाड

शहरी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये उत्साह  मात्र मशीनमध्ये बिघाड

Next

नाशिकरोड : देवळाली विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात सोमवारी दिवसभर मोठ्या उत्साहात उत्स्फूर्तपणे मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाड वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले.
देवळाली मतदारसंघातील शहरी भागातील देवळाली कॅम्प छावणी परिषद, भगूर नगरपालिका वगळून ूइतर ग्रामीण भागातील ८० गावांमध्ये ६६ मतदान केंद्र होते. सोमवारी सकाळी मतदानप्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. विहितगाव मनपा शाळा मतदान केंद्रातील खोली क्रमांक ६ मधील ईव्हीएम मशीन मतदानप्रक्रिया सुरू झाल्यापासूनच तब्बल दोन तास नादुरुस्त झाले होते. यामुळे त्या खोलीत मतदानासाठी आलेल्या मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. सकाळी ९ वाजता नवीन ईव्हीएम मशीन लावून मतदानप्रक्रिया सुरू करण्यात आली.
शहरातील मनपा प्रभाग १९ व २२, देवळाली कॅम्प छावणी परिषद हद्दीत पाच मतदान केंद्रात व २९ खोल्या व भगूर नगरपालिका हद्दीत चार मतदान केंद्रात १२ खोल्यांवर मतदानप्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये भगूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा खोली क्रमांक तीनमध्ये ईव्हीएम सकाळी पावणेअकरा वाजता अर्धातास नादुरुस्त झाल्याने त्या खोलीकरिता सायंकाळी मतदान अर्धा तास वाढवून देण्यात आला होता. देवळालीगाव, विहितगाव भागातील नव मतदारांनी पत्ता देवळाली-६८ असा दिल्याने अनेकांचे मतदान देवळाली कॅम्प भागात आल्याने युवा मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला. मतदार यादीतील गोंधळ, चुकीची नावे, दुबार मतदार यादीत नावे यामुळे मतदारांना त्रास झाला़
देवळाली मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील बेलतगव्हाण, संसरी, राहुरी, दोनवाडे, लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, एकलहरा,
सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, शिंदे, पळदे, मोह, नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागातील दरी, मातोरी, मुंगसरा, दुगाव, गिरणारे, देवरगाव, साडगाव, वडगाव, ओझरखेड, गंगामाळुंजी, विल्होळी, तळेगाव, महिरावणी, बेळगाव ढगा, वासळी आदींसह ८० गावांतील ६६ मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात शांततेत मतदान पार पडले. मतदान काळात कुठेही अनूचित घटना घडली नाही. उन्हाच्या तडाख्यात
मतदार उत्स्फूर्तपणे रांगा लावून मतदान करत होते. 
संसरीत ७० टक्के
खासदार हेमंत गोडसे यांच्या संसरी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रात चार खोल्यांमध्ये मतदान घेण्यात आले. सकाळी मतदारांनी रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजविला. दुपारच्या काळात धिम्या गतीने व सायंकाळी पुन्हा मतदानाचा जोर वाढला होता.
वादविवाद
निवडणुकीच्या मतदानामध्ये यापूर्वी नेहमी बोगस मतदारांवरून मोठ्या प्रमाणात वादविवाद होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. मात्र मतदार यादीत आलेला पारदर्शकपणा, फोटो, ओळखपत्र यामुळे बोगस मतदानाला आळा बसल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

Web Title: In urban rural areas, enthusiasm among the voters is the failure of the machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.