जिल्ह्यात युरियाची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:14 PM2020-07-25T23:14:42+5:302020-07-25T23:14:42+5:30
नााशिक : यावर्षी वेळेत पडलेला पाऊस, लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांचे बंद असलेले प्लांट आणि रेल्वेची अडचणी आदी विविध कारणांमुळे जिल्ह्णात मागीलवर्षीपेक्षा अधिक युरिया उपलब्ध होऊनही त्याची टंचाई जाणवत असून, येत्या एक दोन दिवसांत युरियाबाबतची स्थिती सुधारेल शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढ्याच गोण्या घ्याव्यात, असे आवाहन जिल्ह्णातील कृषी विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नााशिक : यावर्षी वेळेत पडलेला पाऊस, लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांचे बंद असलेले प्लांट आणि रेल्वेची अडचणी आदी विविध कारणांमुळे जिल्ह्णात मागीलवर्षीपेक्षा अधिक युरिया उपलब्ध होऊनही त्याची टंचाई जाणवत असून, येत्या एक दोन दिवसांत युरियाबाबतची स्थिती सुधारेल शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढ्याच गोण्या घ्याव्यात, असे आवाहन जिल्ह्णातील कृषी विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे.
मागीलवर्षी जिल्ह्णात जूनअखेरपर्यंत २१ हजार मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध झाला होता, तरीही युरियाची टंचाई जाणवत नव्हती. यावर्षी जूनअखेरपर्यंत ५८ हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक साठा उपलब्ध होऊनही टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस लवकर झाल्याने पेरण्या लवकर पूर्ण झाल्या आहेत. शिवाय कोरोनाच्या संकटामुळे काही काळ रेल्वे वाहतूक बंद होती. शिवाय काही कंपन्यांचे प्लांटही बंद असल्यामुळे युरियाची मागणी आणि पुरवठा यामध्ये विस्कळीतपणा निर्मण झाला असल्याने युरियाची टंचाई जाणवत आहे. सध्या अनेक शेतकरी युरियासाठी गावोगाव फिरत आहेत. मध्यंतरी पाऊस बंद असल्याने शेतकºयांनी निंदणी-खुरपणीची कामे करून घेतली ही कामे होताच पावसाचे आगमन झाल्याने युरियाची मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. युरिया सर्वांत स्वत खत असल्यामुळे अनेक शेतकºयांचा पिकांना युरिया टाकण्याकडे ओढा असतो. यावर्षी जिल्ह्णात सर्वत्र एकाचवेळी पेरण्यापूर्ण झाल्यामुळे युरियाची मागणी वाढली आहे त्यातुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे युरियाची थोडीफार टंचाई जानवते. मागील दोन दिवसांत नाशिकरोड आणि मनमाड येथे रॅक उपलब्ध झाल्या आहेत. अजून एखादी रॅक उपलब्ध झाली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळेल.
- संदीप शेटे, व्यवस्थापक, नाशिक तालुका शेतकी संघलॉकडाऊनमुळे मार्च, एप्रिल, मे महिन्यांत वेअरहाउसमध्ये मालाचा साठा होऊ शकला नाही. याशिवाय यावर्षी सर्वत्र एकाचवेळी पाऊस पडल्याने शेतकºयांची युरियासाठी झुंबड उडाली. त्यामुळे माल आल्यानंतर तो लगेच संपतो. तरीही प्रत्येक शेतकºयाला एक, दोन गोण्या देण्याचा प्रयत्न करत असतो. युरियाची टंचाई नाही. शेतकºयांनी घाबरून जाऊन एकाचवेळी गर्दी करू नये.
- सुनील मालपाणी,
खतविक्रेते, विंचूर, ता. निफाडतालुकानिहाय वितरीत झालेला युरिया (मे.टन)नाशिक ४४३०,
त्र्यंबकेश्वर १३६६
इगतपुरी २६३६
पेठ १०३१
सिन्नर २५९७
निफाड ५६४४
येवला ६३२८
चांदवड ३२१२
मालेगाव ७३५०
सटाणा ६७५९
नांदगाव ६४३९
कळवण ४९९३
दिंडोरी ३१२७
देवळा ३६९३
सुरगाणा ११५०