गरजेच्या काळातच युरिया खताचा तुटवडा असल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 04:05 PM2018-08-24T16:05:47+5:302018-08-24T16:06:03+5:30

सायखेडा; खरीप हंगामातील पिके जोमात असतांना सध्या पावसाची रिमझिम चालू असल्याने युरिया खताची मात्रा पिकांना देण्याची गरज आहे .सायखेडा परिसरातील सर्व कृषी सेवा केंद्रातील युरिया संपल्याने शेतकº्यांची धावपळ उडाली आहे. खतांचा काळाबाजार होत असल्याने टंचाई निर्माण झाली असल्याची चर्चा आहे.

 Urea is in short supply due to lack of fertilizer | गरजेच्या काळातच युरिया खताचा तुटवडा असल्याने नाराजी

गरजेच्या काळातच युरिया खताचा तुटवडा असल्याने नाराजी

Next
ठळक मुद्देखरीप हंगामातील सोयाबीन, मका ,ऊस, भुईमूग ,भाजीपाला, या नगदी पिकांचा हंगाम सुरू आहे सर्व पिके जोमदार वाढीला लागली असून या पिकांना युरिया खताची आवश्यकता असल्याने शेतकº्यांची खरेदीसाठी धावपळ उडाली आहे.


सायखेडा;
खरीप हंगामातील पिके जोमात असतांना सध्या पावसाची रिमझिम चालू असल्याने युरिया खताची मात्रा पिकांना देण्याची गरज आहे .सायखेडा परिसरातील सर्व कृषी सेवा केंद्रातील युरिया संपल्याने शेतकº्यांची धावपळ उडाली आहे. खतांचा काळाबाजार होत असल्याने टंचाई निर्माण झाली असल्याची चर्चा आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन, मका ,ऊस, भुईमूग ,भाजीपाला, या नगदी पिकांचा हंगाम सुरू आहे सर्व पिके जोमदार वाढीला लागली असून या पिकांना युरिया खताची आवश्यकता असल्याने शेतकº्यांची खरेदीसाठी धावपळ उडाली आहे.
प्रत्येक वर्षी हंगामाच्या सुरवातीला मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध असतो पिकांना आवश्यकता भासल्यास दुकानातील युरिया संपतो डीलर, मोठे दुकानदार कृत्रिम टंचाई निर्माण करून नंतर जास्त भावात विक्र ी करतात. आजही काही दुकानात ४० किलोच्या गोनीसाठी ५०रूपये जास्त दिल्यास काही ठिकाणी युरिया उपलब्द होता. अशी कृत्रीम टंचाईमुळे आर्थिक तोटा सहन करावा लागतो.युरिया सोबत अनेक रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत असल्याने कृषी विभागाच्या वतीने साठवण करणाऱ्या डीलर आणि दुकानदारांच्या गुदमावर छापा टाकून कारवाही करून योग्य भावात खते उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे

Web Title:  Urea is in short supply due to lack of fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.