येवला तालुक्यात युरियाची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 10:48 PM2021-07-15T22:48:26+5:302021-07-16T00:26:15+5:30
जळगाव नेऊर : रुसून बसलेला मान्सूनने येवला तालुक्यात हजेरी लावल्याने उत्तर पूर्व भागात तसेच पश्चिम भागात शेतकरी पिकांना अधूनमधून पडणाऱ्या सरींवर खतांचा डोस देत आहे. मात्र, ऐन मोसमात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने ह्यइतर खते घ्या, तरच युरिया मिळेलह्ण या फतव्याने शेतकरी हैराण झाला आहेत.
जळगाव नेऊर : रुसून बसलेला मान्सूनने येवला तालुक्यात हजेरी लावल्याने उत्तर पूर्व भागात तसेच पश्चिम भागात शेतकरी पिकांना अधूनमधून पडणाऱ्या सरींवर खतांचा डोस देत आहे. मात्र, ऐन मोसमात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने ह्यइतर खते घ्या, तरच युरिया मिळेलह्ण या फतव्याने शेतकरी हैराण झाला आहेत.
येवला तालुक्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात असून, सोयाबीन, मका, बाजरी कापूस, मुग, तूर पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. तसेच पेरणी केलेली पिके खते देणे योग्य आल्याने शेतकऱ्यांची धडपड चालू असताना युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सोयाबीन, बाजरी, कापूस, मका या पिकांना रासायनिक खतांबरोबर योग्य प्रकारे डोस देण्यासाठी युरिया खताची आवश्यकता आहे. या पिकांना योग्यवेळी खते देण्यासाठी शेतकरी विक्रेत्यांकडे फिरत आहे. युरिया हवा असेल तर इतर विद्राव्य खतांची सक्ती केली जात आहे. केवळ युरिया हवा असेल तर विविध कारणे सांगितली जात आहेत. युरिया खत मिळविणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले असून, दुकानदाराच्या हातापाया पडण्याची वेळ आली आहे. ठराविक कंपनीचे युरिया खत बाजारात उपलब्ध असून, युरियाबरोबर इतर खत घेण्याची अट दुकानदारांकडून घातली जात आहे.
प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामात खतांच्या किमती वाढल्या जातात. ऐन मोसमात युरीया खताचा डोस पिकांना मिळाला नाही तर पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कितीही पैसे घेऊन युरिया द्या, अशी मागणी शेतकरी कृषी दुकानदारांकडे करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आधिच आर्थिक अडचणीत सापडला आहे.
येवला तालुक्यात युरिया खतांसाठी दुकानदार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. आज मका, बाजरी या पीकासाठी युरियाची गरज असुन दुकानदार सांगतात एक गोणी इतर कोणत्याही खताची घ्या, नंतरच एक गोणी युरियाची मिळेल, दुकानात युरिया खत शिल्लक असुन सुद्धा शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. सरकारने दुकानदारांवर लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
- श्रावण पाटील देवरे, संपर्क प्रमुख स्वाभिमानी संघटना
संग्रहित छायाचित्र (१५ जळगावनेऊर, १)