सावरकरांच्या साहित्यातून स्वातंत्र्याविषयीची ऊर्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:51+5:302021-05-29T04:12:51+5:30
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३८ वी जयंती साजरी करण्यात ...
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३८ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून हरसुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भामरे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते.
यावेळी डॉ. भामरे यांनी, सशस्त्र क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रवादी, बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, मानवतावादी, कवी, साहित्यिक, नाटककार अशा स्वा. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. सावरकरांच्या अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाचा, ने मजसी ने परत मातृभूमीला या कवितेचा तसेच सावरकरांची नाटके उःशाप, संन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया यांचाही चिकित्सक आढावा त्यांनी घेतला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गमे यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बुद्धिवादी, विज्ञानवादी, मानवतावादी, पुरोगामी विचारसरणीचे कार्य अशा व्याख्यानांमधून अधोरेखित होणे आणि सावरकरांच्या विचारांची तटस्थ चिकित्सा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.डॉ. धनराज धनगर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. कैलास बच्छाव यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. मनीषा गायकवाड यांनी केले.