उगावचा पारा थेट शून्यावर; ओझर ०.९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:10 AM2018-12-31T02:10:12+5:302018-12-31T02:12:07+5:30

वबिंदूचे हिमकण झाल्याचा अनुभव घ्यायचा असेल... कडाक्याची थंडी अर्थात शून्य अंश तापमानाच्या प्रदेशात जाण्याची इच्छा झाली तर डोळ्यापुढे काश्मीर येते. मात्र आता थेट शून्य अंशापर्यंतचे तापमान आणि दवबिंदूच्या स्वरूपात हिमकण अंगावर झेलायचे असल्यास काश्मीर नव्हे तर निफाड तालुक्याची भटकंती भल्या पहाटे करण्यास हरकत नाही. कारण कधी नव्हे ते रविवारी निफाडमधील उगाव, वाकद शिरवाडे या गावांमध्ये पारा थेट शून्यावर घसरल्याची विक्रमी नोंद झाली आहे. निफाडचा अपवाद वगळता राज्यात कुठल्याही जिल्ह्णातील गावांमध्ये पारा शून्यावर पोहचलेला नाही.

Usage of mercury directly on zero; Ozar 0.9 | उगावचा पारा थेट शून्यावर; ओझर ०.९

उगावचा पारा थेट शून्यावर; ओझर ०.९

googlenewsNext
ठळक मुद्देनिफाड नव्हे काश्मीरच !तालुका गोठला, दवबिंदूंचाही झाला बर्फ

नाशिक : दवबिंदूचे हिमकण झाल्याचा अनुभव घ्यायचा असेल... कडाक्याची थंडी अर्थात शून्य अंश तापमानाच्या प्रदेशात जाण्याची इच्छा झाली तर डोळ्यापुढे काश्मीर येते. मात्र आता थेट शून्य अंशापर्यंतचे तापमान आणि दवबिंदूच्या स्वरूपात हिमकण अंगावर झेलायचे असल्यास काश्मीर नव्हे तर निफाड तालुक्याची भटकंती भल्या पहाटे करण्यास हरकत नाही. कारण कधी नव्हे ते रविवारी निफाडमधील उगाव, वाकद शिरवाडे या गावांमध्ये पारा थेट शून्यावर घसरल्याची विक्रमी नोंद झाली आहे. निफाडचा अपवाद वगळता राज्यात कुठल्याही जिल्ह्णातील गावांमध्ये पारा शून्यावर पोहचलेला नाही.
निफाड तालुक्याला राज्याचे काश्मीर म्हटले तर वावगे होणार नाही. कारण मागील दहा दिवसांपासून सातत्याने किमान तापमानाचा पारा कमालीचा घसरत आहे. निफाडमध्ये रविवारी कुंदेवाडी कृषी केंद्रात २.८ अंश तापमान मोजले गेले, तर उगावमध्ये पारा शून्यावर तसेच ओझरमध्ये थेट ०.९ आणि कसबे-सुकेणे येथे १ अंशापर्यंत तापमान खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशांमध्ये हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड लाटेचा परिणाम नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर अधिक झाला आहे.
निफाडमधील काही गावांचे तापमान असे
उगाव- ०.० वाकद शिरवाडे- ०.० ओझर- ०.९
रानवड- ३.० निफाड- २.८
कुंदेवाडी- ३.० कसबे सुकेणे- १.२
शून्य अंशाची नोंद
नाशिक जिल्ह्याच्या नावे
राज्यात यापूर्वी कोठेही शून्य अंशापर्यंत किमान तापमान गेल्याची नोंद नाही. गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या नावे यावर्षी शून्य अंशाची नोंद झाली. निफाड तालुक्यातील दोन गावांमध्ये शून्य अंशापर्यंत तापमान घसरले. त्यामुळे नाशिक जिल्हा राज्यात थंडीच्या बाबतीत सध्या आघाडीवर आहे. कडाक्याची थंडी निफाडमध्ये पडू लागल्यामुळे येथील द्राक्षबागा मात्र संकटात सापडल्या.
द्राक्षांचा हंगाम धोक्यात
निफाड तालुक्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद सातत्याने होत आहे. नागपूरमध्ये रविवारी ४ अंशांपर्यंत जरी पारा घसरला असला तरी निफाडमध्ये कृषी संशोधन केंद्रात २.८ अंशांपर्यंत घसरल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. यामुळे निफाड या बागायती तालुक्यातील द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागांमध्ये अक्षरक्ष: शेतकºयांना शेकोट्या पेटवाव्या लागत आहेत. तसेच द्राक्षमळ्यावरदेखील आच्छादन टाकण्यात आले आहे. दवबिंदूचा बर्फ होऊन जमिनीवर पडत आहे. चापडगाव, खानगावथडी, तारुखेडले, कसबे सुकेणे आदी गावांमध्ये दवबिंदू गोठल्याचे चित्र पहावयास मिळाले.



किमान तापमानाचा पारा वेगाने घसरू लागल्याने निफाड गोठले आहे. तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्णातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. यापूर्वी निफाडमध्ये दहा ते बारा वर्षांपूर्वी १ व २ अंशापर्यंत पारा घसरल्याची नोंद हवामान खात्याकडे आढळते. मात्र यावर्षीच्या थंडीने निफाडमधील सगळे विक्रम मागे टाकले आहेत. कारण निफाड तालुक्यातील उगाव, वाकद शिरवाडेमध्ये रविवारी किमान तापमान शून्य अंश इतके मोजले गेले. त्यामुळे राज्यात नाशिकचा निफाड तालुका थंडीच्या बाबतीत अग्रस्थानी राहिला आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी नाशिकच्या मालेगावमध्ये उणे १ व उणे २ अंशापर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर मात्र शून्यावर पारा घसरण्याची यावर्षी पहिलीच वेळ आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश यांसह उत्तरेकडील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाºया थंड लाटेचा परिणाम नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर अधिक झाला आहे. तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती.

Web Title: Usage of mercury directly on zero; Ozar 0.9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.