कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच अस्त्रांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 12:38 AM2021-04-16T00:38:25+5:302021-04-16T00:38:47+5:30
वणी : सातत्याने कोरोनाबाधितांची वाढती संख्या, आरोग्य प्रशासनावर मर्यादा, खासगी रुग्णालयासंदर्भातील असमाधानकारक उपचार सेवा व शहरी भागातील उपचारासाठी आर्थिक मर्यादा अशा सर्व चक्रव्यूहामध्ये कोरोनाबाधित सापडले आहेत. बाधितांच्या संख्येत होणारी चिंताजनक वाढ ही बाबच कोरोनाचा सामना करण्यासाठी असहाय परिस्थिती निर्माण करीत असल्याने या महामारीचा सामना कसा करावा, असा प्रश्न सामान्यांपुढे उभा ठाकला आहे.

वणी व परिसरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. वणी गावातील व्यावसायिक, नागरिक व प्रशासन यांनी समन्वयात्मक घेतलेल्या निर्णयानुसार पालन केले जात आहे. वणी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसंख्या ही क्षमतेपेक्षा अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयात कोविड कक्षासाठीची प्रक्रिया राबविण्यासाठी गतिमानता आली आहे. ग्रामीण रुग्णालयात इतर आजार व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचा पर्याय राहणार आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात दिंडोरी, चांदवड, सुरगाणा या तीन तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. सुमारे ३०० च्या पुढे ओपीडी असते. त्यात विविध आजारांचे रुग्ण तपासणी व उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र सध्या कोविड बाधितांची संख्या पाहता, रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. बोपेगाव येथे असलेल्या कोविड सेंटरमध्ये वणीच्या तुलनेत आरोग्य सुविधेवर मर्यादा पडतात, अशी भावना बाधितांमध्ये आहे.
वणी गावातील शैक्षणिक इमारत तसेच निवासव्यवस्था होऊ शकेल अशी ठिकाणे याबाबत पर्याय शोधला तर समस्येचे निराकारण होऊ शकेल. दिवसा दिवसाला कोरोनाचा वाढता प्रभाव, व्यवसाय बंद, उदरनिर्वाह कसा चालवायचा ही समस्या, उत्पन्नाचे मार्ग बंद व उपचारासाठी हातात पैसा नाही, अशी ही भीतीदायक वास्तविकता समोर उभी ठाकल्याने कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत आहे.
(१५ कोरोना १)