अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:20 AM2018-06-29T01:20:46+5:302018-06-29T01:22:06+5:30
नाशिक : महापालिकेच्या शहरातील अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेत लाकडांऐवजी गोवºया वापरल्या जाणार आहेत. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या अशासकीय पत्राच्या आधारे गेल्या फेब्रुवारीच्या महासभेत ठराव संमत करण्यात आला आहे. प्रशासन त्याची अंमलबजावणी कशी करते याकडे लक्ष लागून आहे.

मनपाच्या सर्व अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी ठेकेदाराला अन्य साहित्याबरोबरच लाकूड पुरविणे बंधनकारक आहे. वृक्षतोड टाळण्यासाठी याला पर्याय म्हणून विविध योजनांचा या आधी विचार केला जात आहे. नाशिक अमरधाममध्ये डिझेल दाहिनीदेखील असून, ती मात्र सातत्याने बंद पडत असते. स्मार्ट सिटीअंतर्गत याठिकाणी दोन विद्युत दाहिनीदेखील उभारण्यात येणार आहे. तथापि, वृक्षतोड थांबावी यासाठी अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी गोवºयांचा वापर करण्याबाबत अशासकीय प्रस्ताव दिनकर पाटील यांनी महासभेवर सादर केला होता.