कूपनलिका पुनर्भरणाचा प्रयोग
By admin | Published: October 16, 2016 12:55 AM2016-10-16T00:55:36+5:302016-10-16T01:05:44+5:30
माळेगाव : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील श्रीप्रसाद या कारखान्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कूपनलिका पुनर्भरण व सॅण्ड फिल्टर प्रात्यक्षिकांचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला.
कारखान्याच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून सॅण्ड फिल्टरच्या सहायाने कारखान्याच्या आवारातील कूपनलिकेत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रयोगामुळे जमिनीची भूजल पातळी वाढविणे, पाण्यातील क्षारांचे प्रमाण कमी करणे, टंचाई काळात पाण्याची गरज भागविणे यासाठी सदर प्रयोगाचा लाभ होत आहे.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा कूपनलिका पुनर्भरण व सॅण्ड फिल्टर अत्यंत उपयुक्त उपक्रम असून, माळेगाव परिसरातील सर्वच कूपनलिका पुनर्भरणासाठी ग्रामपंचायतीमार्फत हा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे माळेगावचे सरपंच अनिल आव्हाड यावेळी म्हणाले. याप्रसंगी योगेंद्रसिंग पाटील, गोरख जाधव, श्रीकांत शेळके, राकेश बावीस्कर, बाबासाहेब हाडोळे, माजी सरपंच तुकाराम सांगळे, सूर्यभान सांगळे, आमोलिक जाधव, अशोक जाधव, खंडू जाधव, ग्रामविकास अधिकारी कैलास वाक्चौरे, उद्योजक शंकर खोकले, दीपक जाधव आदि उपस्थित होते.
प्रात्यक्षिकासाठी प्रतिष्ठानचे उदय कुदळे, योगेश क्षत्रिय, महेंद्र कानडी, शिवाजी चव्हाण, गोविंद कोळी, संजय शेलार, विक्रम गोसावी, सोपान कोल्हे, परसराम कोल्हे, राजेंद्र परदेशी, श्रीकांत शेळके, विश्राम पाटील, शिवाजी लकडे, मनीष म्हात्रे, किशोर म्हात्रे, अंबादास काकुळते, प्रदीप जाधव, प्रकाश जाधव, मयूर
जाधव, सागर कोथमिरे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)