पोलिसांकडील जागेचा न्यायालयासाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:04 AM2017-10-05T00:04:12+5:302017-10-05T00:04:17+5:30
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी पोलीस मुख्यालयातील अडीच एकर जागा देण्यात आली आहे़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे व नाशिक बार असोसिएशनच्या उपस्थितीत या जागेचा कब्जा न्यायालयीन अधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आला होता़ मात्र, सद्यस्थितीत या ठिकाणी असलेली कार्यालये दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी पोलिसांनी येत्या १० आॅक्टोबरपर्यंत मुदत मागितली असून, त्यानंतर या जागेवर काही न्यायालये व पार्किंग सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़

जिल्हा न्यायालयात दिवसेंदिवस वाढत असलेली गर्दी लक्षात घेता न्यायायलाच्या विस्तारीकरणाची नितांत आवश्यकता होती़ अॅड़ घुगे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर पोलीस विभागातील पाच एकरपैकी अडीच एकर जागा न्यायालयास देण्याचे आदेश दिले़ त्यानुसार पोलिसांनी आपल्याकडील अडीच एकर जागेचे हस्तांतरणही केले आहे़ पार्किंग सुरू होणारया जागेवरील इमारतींमध्ये काही न्यायालये तसेच पार्किंग सुरू केली जाणार आहे़ या जागेवर असलेली पोलिसांची कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागणार असल्याने पोलिसांनी काही दिवसांची मुदत मागून घेतली आहे़