अंत्यविधीसाठी रॉकेलअभावी ग्रामीण भागात डिझेलचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 08:45 PM2019-09-25T20:45:40+5:302019-09-25T20:46:09+5:30
खमताणे : सध्या रॉकेलची तीव्र टंचाई असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अक्षरश: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नसल्याने तेथे नाइलाजास्तव डिझेलचा वापर करावा लागत आहे.
खमताणे : सध्या रॉकेलची तीव्र टंचाई असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अक्षरश: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नसल्याने तेथे नाइलाजास्तव डिझेलचा वापर करावा लागत आहे.
ग्रामीण भागात पावसाळ्यात चुल पटविण्यासाठी रॉकेल लागते. शिवाय विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे रॉकेलचा दिवा आवश्यक असतो. ग्रामीण भागात रॉकेल दुर्मिळ झाल्याने रॉकेलवर चालणारी साधने बाजुला पडली आहेत.
रॉकेलचा दिवा, चिमणी, कंदील, बर्नरचा तसेच वातींचा स्टोव्ह ही साधने निरु पयोगी सिध्द होत आहेत.
पावसाळ्यात लाकडे ओली असतात. त्यामुळे स्मशानभूमीत भडाग्नी देताना ती लवकर पेटत नाहीत. मग राकेल नसल्याने डिझेलचा वापर करावा लागतो. काही ठिकाणी नाइलाजास्तव वाहनांचे जुने टायर-ट्युब यांचा वापर केला जातो. परवानाधारक केरोसिन विकेत्यांचा पुरवठा बंद केल्याने रॉकेलची खरेदी विक्र ी बंद झाली आहे. त्यामुळे आता काही स्मशानभुमीत मृत व्यक्तीस जाळण्याकरीता रॉकेल ऐवजी डिझेलचा वापर करण्यात येत आहे.