विक्रेत्यांकडून घरगुती सिलिंडरचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:18 AM2019-11-25T00:18:49+5:302019-11-25T00:19:33+5:30
येथील पंचवटी परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या शेकडो हातगाडीचालकांकडून सर्रासपणे घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करून उघडपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नाशिक : येथील पंचवटी परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या शेकडो हातगाडीचालकांकडून सर्रासपणे घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करून उघडपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करणा-या बेशिस्त हातगाडीचालकांवर संबंधित विभागाच्या वतीने कारवाई होत नसल्याने प्रशासन अनभिज्ञ असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
घरगुती सिलिंडरचा व्यवसाय करण्यासाठी वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे प्रशासनाच्या पुरवठा विभागाकडून सांगितले जाते तरी दुसरीकडे मात्र गंगाघाट, निमाणी, आडगावनाका यांसह अन्य भागांत उघडपणे घरगुती सिलिंडरचा वापर उघडपणे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी हातगाड्यांवर केला जात असल्याचे दिसून येते.
काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी घरगुती वापरासाठी लागणाºया सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करणाºया काही खाद्यपदार्थ विक्री हातगाडीचालकांवर कारवाई करून सिलिंडर जप्त केले होते. आता पुन्हा पोलिसांनी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी घरगुती सिलिंडर वापर करणाºया परिसरातील हातगाडीधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हातगाडी विक्रेत्यांकडे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर आढळण्याचे कारण म्हणजे काहीवेळा या साखळीतही सिलिंडरमधील गॅसचोरीचे प्रकार समोर आले आहेत. याकडे पुरवठा विभागाचे तसेच संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्यामुळे असे गैरप्रकार घडताना दिसतात. वितरकाकडून आलेले सिलिंडर ग्राहकाला देताना तपासणी करून व वजन करूनच दिले पाहिजे. त्वरित कार्यवाही केली पाहिजे.
व्यवसायासाठी व्यावसायिक सिलिंडरचा वापर बंधनकारक असताना परिसरातील अनेक खाद्यपदार्थ विक्र ी करणारे हातगाडीधारक उघडपणे घरगुती वापरासाठी लागणारे सिलिंडर वापर करतात. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झालेले दिसते.