गोदाघाटाचा वापर पर्यटनवृद्धीसाठी करा

By admin | Published: October 21, 2015 10:03 PM2015-10-21T22:03:00+5:302015-10-21T22:03:54+5:30

छगन भुजबळ : महापालिकेला केली सूचना

Use Godaghat for tourism growth | गोदाघाटाचा वापर पर्यटनवृद्धीसाठी करा

गोदाघाटाचा वापर पर्यटनवृद्धीसाठी करा

Next


नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कोट्यवधी रुपये खर्चून गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले घाट आणि साधुग्रामच्या जागेचा वापर पर्यटन वृद्धीसाठी करण्याची सूचना माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांसह महापौर आणि आयुक्तांना केली आहे.
भुजबळ यांनी प्रसिद्धिपत्रात म्हटले आहे, सिंहस्थ आराखड्यानुसार गोदावरी नदीवर सात घाटांची नव्याने निर्मिती करण्यात आली. सदर घाट हे महापालिकेने जलसंपदा विभागाच्या ताब्यातून घेऊन त्यांचे कायमस्वरूपी संरक्षण व देखभाल करावी. याशिवाय कन्नमवार ते लक्ष्मीनारायण पुलादरम्यानच्या घाटाजवळ असलेले मैदान विविध प्रदर्शने, सभा-समारंभासाठी वापरता येऊ शकेल.
या जागेचा उपयोग पर्यटनासाठी केल्यास महापालिकेला त्यातून शाश्वत स्वरूपात उत्पन्नही प्राप्त होऊ शकेल. मैदानात पीपीपी तत्त्वावर अथवा मनपा निधीतून एका बाजूला स्वच्छतागृह तर एका बाजूला फूड स्टॉल उभारण्यात यावेत. मुलांसाठी खेळणी बसविण्यात यावीत. परिसराचे फुलझाडांनी सुशोभिकरण करावे, अशी सूचना भुजबळ यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Use Godaghat for tourism growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.