कटिंग करताना कागदी चादरीचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:55 PM2020-07-06T23:55:36+5:302020-07-07T01:25:48+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद असलेली सलून दुकाने काही अटी-शर्थींवर सुरू करण्यात आली आहेत. दुकानदार व ग्राहक यांचे आरोग्य अबाधित राहावे व कोरोनाला थोपविण्याचा प्रयत्न म्हणून येथील सलून व्यावसायिकांनी कापडीऐवजी कागदी चादर वापरण्याची शक्कल लढवली आहे.

Use a paper sheet when cutting! | कटिंग करताना कागदी चादरीचा वापर!

कटिंग करताना कागदी चादरीचा वापर!

Next
ठळक मुद्देओझर : कोरोना संसर्गाबाबत ग्राहक निर्धास्त; सलून व्यावसायिकांची शक्कल

ओझर टाउनशिप : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद असलेली सलून दुकाने काही अटी-शर्थींवर सुरू करण्यात आली आहेत. दुकानदार व ग्राहक यांचे आरोग्य अबाधित राहावे व कोरोनाला थोपविण्याचा प्रयत्न म्हणून येथील सलून व्यावसायिकांनी कापडीऐवजी कागदी चादर वापरण्याची शक्कल लढवली आहे.
’युज अ‍ॅण्ड थ्रो’ अशी असलेली कागदी चादर वापरण्यास प्रारंभ केल्याने ग्राहकाला घरून टॉवेल आणण्यायची गरज नाही. कोरोना टाळण्यास व्यवसायिक सज्ज आहेत.
लॉकडाऊनमुळे सलून व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकवेळा आंदोलने करून शासनाने काही अटी-शर्थींवर केशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी दिली. त्यात प्रत्येक ग्राहकाला वेगळा टॉवेल किंवा कपडा वापरण्याचा नियम असल्याने अडचणीचे ठरत होते. व्यावसायिकांनी केशकर्तनालयात वापरण्यात येणारा पारंपरिक कापडाऐवजी युज अ‍ॅण्ड थ्रो कागदी चादरीचा वापर सुरू केला आहे. एका वेळेस एकच ग्राहकास सलूनमध्ये प्रवेश दिला जात आहे. तत्पूर्वी खुर्ची सॅनिटाइझ केली जात आहे. ग्राहकाच्या हातावर सोडियम हायपोक्लोराईडचा फवारा मारला जातो तसेच कात्री, कंगवा व इतर साहित्यही निर्जंतुक केले जात आहे.

Web Title: Use a paper sheet when cutting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.