सलून व्यावसायिकांकडून पीपीई किटचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:29 PM2020-07-18T20:29:59+5:302020-07-19T01:01:47+5:30
नांदूरवैद्य : कोरोना संसर्गामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला सलून व्यवसाय पूर्ववत सुरू झाला असतानाच आता ग्रामीण भागातही या व्यावसायिकांकडून पीपीई कीट घालून स्वत:स ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. सलूनमध्ये ग्राहकांकडूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
नांदूरवैद्य : कोरोना संसर्गामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला सलून व्यवसाय पूर्ववत सुरू झाला असतानाच आता ग्रामीण भागातही या व्यावसायिकांकडून पीपीई कीट घालून स्वत:स ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. सलूनमध्ये ग्राहकांकडूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता आकडा पाहता कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वत:ची काळजी स्वत:च घेणे गरजेचे झाले आहे. त्यात सलून व्यावसायिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील सलून व्यवसाय कोरोनापासून पुरेपूर काळजी घेतांना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेले सलून व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाले असले तरी काही भागात कोरोनाबाधित रु ग्ण आढळल्यामुळे त्या भागातील सलून व्यवसाय अजूनही सुरु झाले नाहीत. यामुळे अशा परिस्थितीत ग्राहकांना दुकानात येतांना सुरक्षित वाटावे यासाठी पीपीई किट खरेदी केले असून त्याच्या नियमति वापरामुळे ग्राहक देखील मनात संकोच न करता दुकानात येत असतात. ग्राहकांना देखील मास्क लावल्याशिवाय दुकानात प्रवेश दिला जात नाही. काम झाल्यानंतर सर्व साहित्य सॅनिटायझर मारून स्वच्छ केले जाते. अर्थात यासाठी खर्च वाढला असला तरी सुरक्षिततेसाठी हे आवश्यकच असल्याचे सलून व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यासाठी आता संघटनास्तरावर दर वाढीबाबतही चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
---------------------
या पीपीई किट वापरामुळे ग्राहकांच्या संख्येतही वाढ होत आहे. ग्राहकांनाही त्यामुळे सुरक्षित वाटत आहे. नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हात स्वच्छ साबणाने धुवावेत, तसेच बाहेर पडतांना तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडावे. त्याशिवाय दुकानात प्रवेश दिला जात नाही.
- योगेश कोरडे, सलून चालक