दुर्गम भागात सौर ऊर्जेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 02:02 AM2018-11-19T02:02:10+5:302018-11-19T02:02:19+5:30

विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतकºयांनी सौरचा वापर करीत सिंचन केले आहे.

Use solar energy in remote areas | दुर्गम भागात सौर ऊर्जेचा वापर

दुर्गम भागात सौर ऊर्जेचा वापर

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांना शाश्वत वीज : सिंचनाच्या सुविधेमुळे उत्पादनात वाढ

नाशिक : विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतकºयांनी सौरचा वापर करीत सिंचन केले आहे.
अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मितीला चालना देण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले असून, सौर ऊर्जेसाठी शेतकºयांना प्रोत्साहितदेखील केले जात आहे.याचा लाभ जिल्ह्णातील शेतकºयांकडून घेतला जात आहे, तर काही शेतकºयांनी आपल्या आर्थिक कुवतीनुसार सौर पॅनल उभारले आहेत. केंद्र सरकारच्या अटल सौर कृषिपंप योजनेतून नाशिक जिल्ह्णातील दुर्गम भागातील ९३ शेतकºयांना शेतीच्या सिंचनासाठी सौरकृषी पंप उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी ४ कोटी ४७ लाख निधी खर्च करण्यात आला आहे. सौर ऊर्जेच्या साह्णाने सिंचन करण्याची सुविधा मिळाल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळाली आहे.
शेतीसाठी सौर ऊर्जा एक उत्तम पर्याय असल्यामुळे शेतकºयांना दिवसाच्या वेळी अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज कंपनीच्या उपकेंद्राच्या ठिकाणी सौर ऊर्जानिर्मितीदेखील प्रस्तावित करण्यात आली आहे. या उपकेंद्रातून शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्रपणे सौर वीज वाहिनी उभारण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक सौरशेती सिन्नरमध्ये
सौरकृषी योजनेतून जिल्ह्यातील शेतकºयांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या योजनेतून मंजूर झालेल्या सौरसंचापैकी सर्वाधिक १५ सौरपंच हे एकट्या सिन्नर तालुक्यात आहेत. तीन ते पाच एकर शेतीसाठी शेतकºयांनी सौरसंचाचा वापर सुरू केला आहे. या शेतकºयांना ९५ टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळालीदेखील आहे. विजेवर उपलब्ध राहणाºया शेतकºयांना आता दिलासा मिळाला असून, पूर्वी रात्रीच्या सुमारास शेतीला मिळणारी वीज सौरच्या माध्यमातून दिवसा उपलब्ध झाल्याने शेतकºयांच्या दैनंदिन व्यवहारातही सकारात्मक बदल झाले आहेत.

Web Title: Use solar energy in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.