तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 04:11 PM2019-02-02T16:11:51+5:302019-02-02T16:12:02+5:30

निलिमा पवार : वरखेडा शाळेत सांस्कृतिक महोत्सव

Use of technology is the need of the hour | तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज

तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देशाळेला ५ प्रोजेक्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल शालेय समितीच्या सदस्यांचा सत्कार निलीमा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

वरखेडा : अध्ययन अध्यापन पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून त्याचा सर्वांनी स्वीकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस श्रीमती निलीमा पवार यांनी केले,
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील जनता विद्यालयात आयोजित सांस्कृतिक महोत्सव व ई क्लास रूम उद्घाटन कार्यक्र म प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. व्यासपीठावर संस्थेचे संचालक दत्तात्रेय पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष संजय पडोळ, राजेंद्र उफाडे, किसनराव भुसाळ, दत्तात्रेय वडजे, दशरथ उफाडे, बापूराव उफाडे, जयराम उफाडे, सुभाष वडजे, पद्माकर वडजे, शाळेचे मुख्याध्यापक बी.बी.डोखळे, श्रीमती पुजा नरोडे आदी उपस्थित होते. कार्यक्र म प्रसंगी अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले. याप्रसंगी शाळेला ५ प्रोजेक्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल शालेय समितीच्या सदस्यांचा सत्कार निलीमा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रीमती के.डी. गायकवाड, एन. व्ही. बुवा, एस. के. मालसाने, परिवेक्षक बी.बी. ढोकरे, सांस्कृतिक विभागप्रमुख संदीप नागपुरे आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन सुभाष ढिकले यांनी केले.
दर शनिवार दप्तराविना
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा व विद्यार्थांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेमरर्फत ‘दर शनिवार दप्तराविना’ हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. शाळांनी या दिवशी खेळ, वक्तृत्व स्पर्धा, अभिनय, नाट्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करावे असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

Web Title: Use of technology is the need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.