बस तिकीट आरक्षणासाठी वापरा 'यूपीआय'; प्रवाशांना मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:07 IST2025-02-18T17:07:12+5:302025-02-18T17:07:33+5:30

आरक्षण खिडकीवर डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नसल्यामुळे प्रवाशांना रोख मिळवण्यासाठी एटीएम सेंटरचे हेलपाटे मारावे लागत होते.

Use UPI for bus ticket reservation Passengers get relief | बस तिकीट आरक्षणासाठी वापरा 'यूपीआय'; प्रवाशांना मिळाला दिलासा

बस तिकीट आरक्षणासाठी वापरा 'यूपीआय'; प्रवाशांना मिळाला दिलासा

नाशिक : मेळा बसस्थानकातील आरक्षण खिडकीवर यूपीआय अथवा तत्सम डिजिटल प्रणालीद्वारे आगाऊ तिकीट आरक्षित करण्याची सुविधा नसल्याचे वृत्त 'लोकमत'ने मंगळवारी (दि. ११) प्रसिद्ध केले होते. त्यामुळे महामंडळाने तातडीने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आरक्षण खिडकीवर डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नसल्यामुळे प्रवाशांना रोख मिळवण्यासाठी एटीएम सेंटरचे हेलपाटे मारावे लागत होते.

बऱ्याचदा परगावाहून आलेल्या प्रवाशांना एटीएमच्या शोधात भटकंती करण्याची वेळ येत होती. तसेच, रोख पैसे असले तरी तिकीट आरक्षित करताना सुट्या पैशांची चणचण भासल्यामुळे, खिडकीवरील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये खटके उडत होते. यामुळे आरक्षण खिडकीवर यूपीआय आणि तत्सम डिजीटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. महामंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे एसटी प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना तिकीट आरक्षित करणे सोयीचे होणार आहे.
 
प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. आरक्षण खिडकीवर यूपीआय आणि कार्डद्वारे पेमेंट करण्याची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित करणे सोयीचे होईल.
- संजय मोहिते, स्थानकप्रमुख, मेळास्थानक

तो फलकही हटला
आरक्षण खिडकीवर यूपीआय पेमेंट होत नाही, अशा आशयाचा बोर्ड लावण्यात होता. 'लोकमत'च्या बातमीनंतर महामंडळाने तेथे यूपीआय आणि कार्डद्वारे पेमेंटची सुविधा करून दिली. त्यानंतर महामंडळाने तो फलकही हटवला आहे.

Web Title: Use UPI for bus ticket reservation Passengers get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.