व्ही. जे. हायस्कूलमध्ये योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:37+5:302021-06-22T04:10:37+5:30
सुरुवातीला सूक्ष्म योग व व्यायामप्रकार घेण्यात आले. नंतर क्रमाक्रमाने विविध आसने करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात प्राणायामचे कपालभाती, अनुलोम-विलोम, शितली, ...
सुरुवातीला सूक्ष्म योग व व्यायामप्रकार घेण्यात आले. नंतर क्रमाक्रमाने विविध आसने करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात प्राणायामचे कपालभाती, अनुलोम-विलोम, शितली, भ्रामरी प्राणायाम घेण्यात आले. शांतिपाठाने समारोप करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक दयाराम अहिरे यांनी केले. प्रमुख अतिथी शालेय समितीचे अध्यक्ष संजीव धामणे यांनी विद्यार्थिदशेत योगामुळे मन व आरोग्य सुदृढ ठेवता येते, असे सांगितले. कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी योगासनांचे प्रकार सांगितले.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन क्रीडा शिक्षिका सुनीता देवरे यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक भास्कर जगताप, भैयासाहेब चव्हाण, राजेश भामरे, प्राजक्ता आहेर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, अर्धवृष्टसन, मंडुकासन, वक्रासन, मकरासन, भुजंगासन, सेतुबंधासन, उत्तानपादासन, अर्धहलासन, हलासन, शवासन आदी आसने सादर करण्यात आली.
फोटो - २१ नांदगाव योगा
नांदगावी योगदिनी योगासनांची प्रात्यक्षिके करताना व्ही. जे. हायस्कूलचे विद्यार्थी.
===Photopath===
210621\21nsk_11_21062021_13.jpg
===Caption===
नांदगावी योगदिनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर करतांना व्ही. जे. हायस्कूलचे विद्यार्थी.