सायखेडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:10 AM2018-08-06T00:10:12+5:302018-08-06T00:11:11+5:30

सायखेडा : येथील सायखेडा-शिंगवे रस्त्यालगत देवी मंदिरापासून जवळच असलेल्या दशरथ गणपत कुटे यांच्या गट नं. ४०६ शेतात रात्री गाय व वासरी बांधलेली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत तीन वर्षांची वासरी ठार केली. मांजरगाव येथे बिबट्याला पकडल्याची घटना तसेच शिंगवे येथील शेतमजुरावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सायखेडा येथे ही घडल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Vaasari killed in a leopard attack in Sikheida | सायखेडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार

सायखेडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार

googlenewsNext

सायखेडा येथे वनविभागाने लावलेला पिंजरा. सोबत वनसेवक भैया शेख, उल्हास उगले व शेतकरी.

सायखेडा : येथील सायखेडा-शिंगवे रस्त्यालगत देवी मंदिरापासून जवळच असलेल्या दशरथ गणपत कुटे यांच्या गट नं. ४०६ शेतात रात्री गाय व वासरी बांधलेली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत तीन वर्षांची वासरी ठार केली. मांजरगाव येथे बिबट्याला पकडल्याची घटना तसेच शिंगवे येथील शेतमजुरावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सायखेडा येथे ही घडल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
गोदाकाठ परिसरात चाटोरी, बेरवाडी, सोनगाव, करंजगाव, मांजरगाव या सर्वच ठिकाणी बिबट्याने हल्ला चढविल्याच्या घटना घडल्या आहेत.
बिबट्यांची संख्या इतकी वाढली कशी व पिंजऱ्यात पकडलेले बिबटे जातात कुठे, असा प्रश्न येथील ग्रामस्थ व शेतकरी करीत आहे. सदरील घटनांमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले असून, शेतीची कामे विस्कळीत झाली आहेत. वनविभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांची शोध मोहीम राबवून या दहशतीतून मुक्तता करण्याची मागणी होत आहे. वनविभागाने या घटनेनंतर संवेदनशील राहण्याची मागणी केली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संजय भंडारी, वनरक्षक विजय टेकनर यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक भैया शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून गट नं. २७५ मधील क्षेत्रात पिंजरा लावला आहे.

Web Title: Vaasari killed in a leopard attack in Sikheida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक