नासाकावर अवसायक नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:57 PM2017-09-18T23:57:20+5:302017-09-19T00:10:37+5:30
प्रशासकीय मंडळ बरखास्त : विक्रीचा मार्ग मोकळा नाशिक : राज्य सरकारने नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी नियुक्त केलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करून नासाकावर दोन अवसायकांची नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक : राज्य सरकारने नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी नियुक्त केलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करून नासाकावर दोन अवसायकांची नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा बॅँकेचे हेमंत गोसावी व विभागीय सहनिबंधक कार्यालयातील विभागीय उपसहनिबंधक दिगंबर हौसारे या दोघांची नासाकावर नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेला तसे पत्र प्राप्त झाले आहे.
दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांना सोमवारी (दि.१८) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळातील एका शिष्टमंडळाने याबाबतची माहिती दिली. तसेच कर्जमाफीचा निधी लवकरात लवकर जिल्हा बॅँकेकडे शासनाकडून वर्ग करण्याची विनंती केली. जिल्हा बॅँकेला नासाका सुरू करण्याबाबत ना हरकत दाखला देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याचे व त्यानंतर याप्रश्नी अवसायक नियुक्ती रद्द करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नाशिक दौºयावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांची जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह सात ते आठ संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. कर्जमाफीचा निधी लवकरात लवकर जिल्हा बॅँकेकडे राज्य सरकारकडून वर्ग करण्याबाबत या शिष्टमंडळाने पालकमंत्री गिरीश महाजन यांना विनंती केली. तसेच नाशिक सहकार साखर कारखान्याला ना हरकत दाखला देता येणार नाही. कारण नासाकावर अहमदनगर साखर सहसंचालक कार्यालयाने अवसायक म्हणून जिल्हा बॅँकेचे अधिकारी हेमंत गोसावी व विभागीय उपसहनिबंधक दिगंबर हौसारे यांची नियुक्ती केल्याचे सांगितले. जिल्हा बॅँकेने सरफेसी कायद्यानुसार नासाकाच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली असून, येत्या २९ सप्टेंबरपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे. नासाका अवसायानात निघून त्यावर अवसायकाची नियुक्ती झाल्याने आणि प्रशासकीय मंडळ बरखास्त झाल्याने नासाकाचे बॉयलर पेटण्याची आशा दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे.
इन्फो..
२९ रोजी बॅँकेची सभा
जिल्हा बॅँकेची येत्या २९ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली असून, ही सभा विविध विषयांनी वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या मार्चपासून जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने तो चर्चेचा विषय आहे.
अध्यक्ष पदाला बगल
जिल्हा बॅँकेवर भाजपाचा संचालक अध्यक्ष करण्याच्या हालचाली भाजपाच्या गोटातून सुरू असताना पालकमंत्र्यांच्या भेटीत मात्र या विषयाला बगल देण्यात आल्याचे कळते. या विषयावर अवाक्षरदेखील चर्चा झाली नसल्याचे कळते. अध्यक्ष पदाला बगल
जिल्हा बॅँकेवर भाजपाचा संचालक अध्यक्ष करण्याच्या हालचाली भाजपाच्या गोटातून सुरू असताना पालकमंत्र्यांच्या भेटीत मात्र या विषयाला बगल देण्यात आल्याचे कळते. या विषयावर अवाक्षरदेखील चर्चा झाली नसल्याचे कळते.