सुट्टीच्या दिवशी राबविले स्वच्छ गाव अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 03:19 PM2019-12-08T15:19:09+5:302019-12-08T15:23:57+5:30

स्वच्छ अभियान हे नेहमी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविले जात असल्याचे दिसते पण चांदशी गावातील ग्रामसेवक सुरेश भांबोरे यांनी आपल्या कुटुंबीय व ग्रामपंचायत सदस्य यासह रविवारची सुट्टी गावात स्वच्छता अभियान राबविले

Vacation organized by Clean Village | सुट्टीच्या दिवशी राबविले स्वच्छ गाव अभियान

सुट्टीच्या दिवशी राबविले स्वच्छ गाव अभियान

Next
ठळक मुद्देग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात स्वच्छता अभियान राबविलेगावातील नागरिकांनी देखील यात सहभाग नोंदविला.कुटुंबाला कोठेही फिरायला न नेता आपण कार्यरत असलेल्या गावात स्वच्छता करण्यावर सुट्टी घालविली

नाशिक: एरवी स्वच्छ अभियान हे नेहमी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविले जात असल्याचे दिसते पण चांदशी गावातील ग्रामसेवक सुरेश भांबोरे यांनी आपल्या कुटुंबीय व ग्रामपंचायत सदस्य यासह रविवारची सुट्टीचे औचित्त साधून गावात स्वच्छता अभियान राबविले. याचा आदर्श घेत गावातील नागरिकांनी देखील यात सहभाग नोंदविला.
       चांदशी गावातील ग्रामसेवक व इतर अधिकारी वर्गाने आपल्या कुटुंबाला कोठेही फिरायला न नेता आपण कार्यरत असलेल्या गावात स्वच्छता करण्यावर सुट्टी घालविली. सुट्टीचा दिवस स्वच्छ ग्रामीण दिवस म्हणून साजरा केला. त्यामुळे अचानक आपल्या गावात अधिकारी व कुटुंबीय काम करत असल्याचे पाहत गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेत कामास सुरवत केली. यामुळे गावही स्वच्छ झाले आणि सुट्टी देखील साजरी झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. सुमारे १५० महिला व पुरु ष मंडळीनी या कार्यात आपला सहभाग घेतला. यावेळी अशोका कॉलेज महाराष्ट्र ग्रामीण बँक चौक पासून ते गावापर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करत गावात व परिसरात घाण टाकणाºया वर दंडात्मक कारवाईची मागणी गावातील महिलांनी केली. यावेळी सरपंच साळूबाई कचरे, उपसरपंच गोदावरी गायकर, सदस्य राहुल पाटील, विमल गुळवे, अरु ण रोकडे, युवराज कचरे ,चैतन्य गायकर, बिरारी साहेब, कमलताई उगले, विशाल उगले आदी उपस्थित होते.

Web Title: Vacation organized by Clean Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.