हॉटेल व्यावसायिक, कारागिरांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून प्राधान्याने लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:50+5:302021-06-16T04:18:50+5:30
येवला : हॉटेल व्यावसायिक, कारागिरांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी येथील हॉटेल व्यापारी असोसिएशनने एका ...
येवला : हॉटेल व्यावसायिक, कारागिरांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी येथील हॉटेल व्यापारी असोसिएशनने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
येवला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नेहते यांना सदर निवेदन देण्यात आले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असून हॉटेल, रेस्टॉरंट ग्राहकांसाठी खुले झालेले आहे. हॉटेल व्यावसायिक, चालक-मालक, कारागीर यांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करावे, लसीकरणासाठी स्वतंत्र शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असेही सदर निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश तक्ते, उपाध्यक्ष दीपक गुप्ता, सचिव योगेंद्र वाघ, सहसचिव सागर नाईकवाडे, खजिनदार सुभाष गांगुर्डे, सहखजिनदार संजय पवार, कार्यकारिणी सदस्य निरंजन परदेशी, बद्रीनाथ तांदळे, सुरेश खैरमोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
--------------------------
येवला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नेहते यांना निवेदन देताना हॉटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश तक्ते. समवेत दीपक गुप्ता, सुभाष गांगुर्डे आदी. (१५ येवला २)
===Photopath===
150621\15nsk_20_15062021_13.jpg
===Caption===
१५ येवला २