पंचवटीत ५९ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:30+5:302021-06-04T04:12:30+5:30
१६ जानेवारीपासून देशपातळीवर सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत प्रारंभी फ्रंटवर्कर व हेल्थ वर्कर यांनाच लस देण्यात आली. त्याची नाशकातील सुरूवात ...
१६ जानेवारीपासून देशपातळीवर सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत प्रारंभी फ्रंटवर्कर व हेल्थ वर्कर यांनाच लस देण्यात आली. त्याची नाशकातील सुरूवात मात्र पहिले केंद्र म्हणून पंचवटीतील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात पहिली लस शासकीय कर्मचाऱ्याला देऊन करण्यात आली होती. पंचवटीत इंदिरा गांधी, मायको दवाखाना, म्हसरूळ, नांदूर, मखमलाबाद, तपोवन, हिरावाडी (कालिकानगर), रेडक्रॉस आदि ८ लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लसीकरण केले जाते. या लसीकरण केंद्रांपैकी प्रमुख केंद्र असलेल्या इंदिरा गांधी रुग्णालयात २० हजार ९५२ पेक्षा जास्त नागरिकांना लस डोस
देण्यात आले आहे.
संपूर्ण शहरात ३० केंद्र आहेत. नाशिक पूर्व, सिडको सातपूर, नाशिकरोड, पश्चिम, पंचवटी या सहा विभागात केवळ पंचवटीत सर्वाधिक ९ केंद्र असून, पंधरवड्यापूर्वी वाल्मिकनगर केंद्र सुरू केले. १०वे लसीकरण केंद्र पेठरोडला सुदर्शन कॉलनीत सुरू करण्यात येणार होते. मात्र, लस तुटवडा असल्याने सदर केंद्र सुरू करण्यात आले नाही. नोडल वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय देवकर यांच्या नेतृत्त्वाखाली पंचवटी विभागात लसीकरण मोहीम सुरू आहे. पंचवटीत असलेल्या लसीकरण केंद्रावर प्रत्येक केंद्रात दैनंदिन किमान २०० नागरिकांना व इंदिरा गांधी रुग्णालयात ३०० नागरिकांना
लस देण्याचे काम केले जात आहे.