पाथरेत एकाच दिवसात ७०० नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:58+5:302021-09-23T04:15:58+5:30

मोरया मित्रमंडळ दरवर्षी गणपती उत्सवादरम्यान सामाजिक कार्य करत असते. मंडळामार्फत दरवर्षी गरजूंना आर्थिक मदत, पूरग्रस्तांना मदत, रक्तदान, अनाथ विद्यार्थ्यांना ...

Vaccination of 700 citizens in a single day in Pathre | पाथरेत एकाच दिवसात ७०० नागरिकांचे लसीकरण

पाथरेत एकाच दिवसात ७०० नागरिकांचे लसीकरण

Next

मोरया मित्रमंडळ दरवर्षी गणपती उत्सवादरम्यान सामाजिक कार्य करत असते. मंडळामार्फत दरवर्षी गरजूंना आर्थिक मदत, पूरग्रस्तांना मदत, रक्तदान, अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्ष लागवड अशा अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते. या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता वावी आरोग्य केंद्राच्या डॉ. छाया खाटेकर (राशीनकर) व डॉ. गायत्री कडू यांना मोरया मित्रमंडळाकडून विनंती करून ७०० नागरिकांच्या लसीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार आरोग्य केंद्रांनी दाखल घेत ७०० लसीचा विक्रमी टप्पा पार पाडला. सदर लसीकरणास सीवायडीएच्या कार्यकर्त्यांनी ही सहकार्य केले. यावेळी पाथरे बुद्रूकच्या सरपंच सुजाता भाऊसाहेब नरोडे, मोरया मंडळाचे अध्यक्ष हर्षल चिने, उपाध्यक्ष भूषण नरोडे व मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागात अजूनही नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात लस मिळत नाही. कोरोना काळात लसींची अत्यंत गरज असल्याने मोरया मंडळाने ग्रामस्थांसाठी ७०० लसींची उपलब्धता केली होती. यातून कोरोनावर मात करता येईल हाच उद्देश असल्याचे अध्यक्ष हर्षल चिने, उपाध्यक्ष भूषण नरोडे यांनी सांगितले.

फोटो - २२ पाथरे लसीकरण

सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे लसीकरणाच्या वेळी उपस्थित आरोग्य अधिकारी, कर्मचारी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ.

220921\22nsk_19_22092021_13.jpg

फोटो - २२पाथरे लसीकरण सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे लसीकरणाच्या वेळी उपस्थित आरोग्य अधिकारी, कर्मचारी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ.

Web Title: Vaccination of 700 citizens in a single day in Pathre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.