कणकोरी येथे ९० व्यक्तींचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:47+5:302021-05-11T04:14:47+5:30
ज्येष्ठ नागरिक शंकर बैरागी यांना लस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांना दापूर प्राथमिक आरोग्य ...
ज्येष्ठ नागरिक शंकर बैरागी यांना लस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांना दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व दोडी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी जाणे गैरसोयीचे झाले होते. याचा विचार करून माजी उपसरपंच रामनाथ सांगळे, सरपंच योगिता सांगळे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरवठा केला. वैद्यकीय अधिकारी नितीन म्हस्के, आरोग्य केंद्राचे प्रणाली दिघे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरणासाठी ९० लसींचे डोस उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायतीच्या वतीने फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करत लसीकरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच अण्णासाहेब बुचकुल, समुदाय आरोग्य अधिकारी प्रणाली दिघे, आरोग्य सेविका एन. एम. कापरे, मनीषा आहिरे, विठ्ठल वणवे आदींसह आशा कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.