तिसगावला लसीकरण जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:14+5:302021-06-03T04:11:14+5:30
तहसीलदार पंकज पवार यांनी तिसगाव येथील आदिवासी कुटुंबाना भेट देऊन लसीकरणाबाबत चर्चा केली, तसेच कोविड प्रतिबंधक लसीपासून मानवी शरीराला ...
तहसीलदार पंकज पवार यांनी तिसगाव येथील आदिवासी कुटुंबाना भेट देऊन लसीकरणाबाबत चर्चा केली, तसेच कोविड प्रतिबंधक लसीपासून मानवी शरीराला कुठलाही धोका किंवा दुष्परिणाम होत नाही, असे समजावून सांगितले. शासन ग्रामीण भागात मोफत लस पुरविते, परंतु आदिवासी बांधव गैरसमज अफवांमुळे लसीकरणासाठी तयार होत नाही. प्रत्येकाने लस घेऊन गाव कोरोनामुक्त करावे. सदर लस घेतल्यास गावाला विविध योजना/ बक्षीस मिळणार आहेत. यासाठी नागरिकांनी १०० टक्के लसीकरण करावे, असे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी केले.
यावेळी तिसगावच्या सरपंच अश्विनी भालेराव, उपसरपंच शरद गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य समृद्धी भालेराव, अश्विनी भालेराव, प्रेरणा बागुल, रोशन ढगे, किशोर बागुल, कमलाबाई गुंबाडे, हेमलता कडाळे, यांच्यासह नितीन भालेराव, ग्रामसेवक सैय्यद, तलाठी सोनटक्के, कोतवाल रतन खैरनार, संदीप निकम, शशिकांत सोनवणे आदी उपस्थित होते.
फोटो- ०२ दिंडोरी तिसगाव
तिसगाव येथे लसीकरणाबाबत जागृती करताना तहसीलदार पंकज पवार, समवेत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ.
===Photopath===
020621\02nsk_16_02062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०२ दिंडोरी तिसगावतिसगाव येथे लसीकरणाबाबत जागृती करताना तहसिलदार पंकज पवार. समवेत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ.