कळवण तालुक्यात आदिवासी बोली भाषेत लसीकरण जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:04+5:302021-06-06T04:11:04+5:30

महाराष्ट्रभर कोरोना प्रतिबंधक लस मिळत नसल्याची ओरड होत असताना कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात लसीकरणाबाबत निरुत्साह आहे. लसीकरणाचा मंदावलेला वेग ...

Vaccination awareness in tribal dialect in Kalvan taluka | कळवण तालुक्यात आदिवासी बोली भाषेत लसीकरण जनजागृती

कळवण तालुक्यात आदिवासी बोली भाषेत लसीकरण जनजागृती

Next

महाराष्ट्रभर कोरोना प्रतिबंधक लस मिळत नसल्याची ओरड होत असताना कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात लसीकरणाबाबत निरुत्साह आहे. लसीकरणाचा मंदावलेला वेग लक्षात घेऊन आदिवासी बोली भाषेत कोरोना प्रतिबंध व लसीकरण जनजागृती मोहीम जलतज्ज्ञ डॉ. किशोर कुंवर आदिवासी भागात राबवत असून, या अनोखा उपक्रमाला आदिवासी बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्था कळवण व महिला विकास फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त उपक्रमाने कळवण तालुक्यातील आदिवासीबहुल भागात कोरोना प्रतिबंधक व लसीकरण जनजागृती मोहीम हाती घेतली असून, पश्चिम पट्ट्यातील जिरवाडे - कुमसाडी या गावांपासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असताना एकीकडे नागरिकांतील भीती काहीशी कमी झाली आहे तर दुसरीकडे पश्चिम पट्ट्यात लसीकरणाच्या बाबतीत निरुत्साह दिसून येत असल्यामुळे जलतज्ज्ञ डॉ. किशोर कुवर, वैद्यकीय अधिकारी डॉ जगदीश जाधव, औषधनिर्माण अधिकारी विकास थोरात लसीकरण संदर्भातील गैरसमज व महत्त्व पटवून देत आहेत .

आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहार असणे गरजेचे आहे. लसीकरणानंतर कोरोना संसर्ग संभवतो; परंतु रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी होते. त्यासाठी आपण लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, तसेच कोरोनासारख्या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेळोवेळी काही आदर्श नियमावली आखून दिली आहे, त्याची अंमलबजावणी करणे एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी असल्याचे ते पटवून देत आहेत. डॉ. कुवर यांनी मुखपट्टी वापरण्याबाबत घ्यावयाची काळजी, हाताळणी, शारीरिक अंतर, वेळोवेळी हात धुणे, स्वतःच्या आरोग्यविषयी जागरूक राहून कोरोनासदृश लक्षणे जाणविल्यास आवश्यक ती चाचणी करून वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार करून घेणे आदींबाबत नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत.

शहरातील नागरिक लसीकरण करवून घेण्यासाठी आपल्या गावाकडे येत आहेत, हे लक्षात घेऊन आपल्यासाठी आलेली लस घेण्यासाठी आपण आग्रही राहायला हवे आणि आपले व आपल्या कुटुंबाचे लसीकरण करून घ्यावे. आरोग्य विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा आपल्या स्तरावर काम करीत असून, शंभर टक्के लसीकरण करून घ्यावे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन करून नागरिकांच्या शंका-कुशंकांचे त्यांनी निरसन केले.

सदर जनजागृती मोहिमेच्या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात कोपरा बैठकीने झाली अन् हळूहळू उत्साह वाढत गेला. अपेक्षित लाभार्थी लस घ्यायला तयार नसतील तर आम्ही लस करवून घ्यायला उत्सुक आहोत, अशी भूमिका येथील तरुणांनी मांडली .

जनजागृती कार्यक्रम प्रसंगी बापखेडा ग्रुप ग्रामपंचायतीचे पोलीस पाटील लक्ष्मण गायकवाड, कुमसाडीचे सरपंच सुनील चौधरी, माजी सरपंच बाजीराव गायकवाड आदींनी कोरोना, लसीकरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. शंकांचे निरसन वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश जाधव व औषध निर्माण अधिकारी विकास थोरात यांनी केले. यावेळी शिवाजी गायकवाड, वामन गायकवाड, दिनकर गांगुर्डे, सुखदेव गांगुर्डे, रंगनाथ गवळी, संदीप गायकवाड, गणेश जगताप, हरिश्चंद्र गवळी, संजय गायकवाड, बस्तीराम गायकवाड आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.

कोट...

आदिवासी बांधवांना वेळोवेळी लस घेण्याबाबत सांगत होतो; मात्र लसीबाबत त्यांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. डॉ. कुवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंध व लसीकरण जनजागृती मोहीम राबवून आमच्या आदिवासी बोली भाषेत समजून सांगितल्यामुळे गैरसमज दूर होतील.

- लक्ष्मण गायकवाड,

पोलीस पाटील, बापखेडा.

कोट...

शासनाने आम्हा आदिवासी तरुणांना म्हणजे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस दिल्यास आम्ही प्राधान्याने घेऊ. त्यामुळे आमच्या कुटुंबातील वयोवृद्धांमध्ये असलेले गैरसमज दूर होऊन इतरही आमचे आदिवासी बांधव लसीकरण करून घेतील. - सुनील चौधरी,

सरपंच, कुंमसाडी.

===Photopath===

050621\05nsk_10_05062021_13.jpg

===Caption===

आदिवासी बोली भाषत संवाद साधताना डॉ. कुंवर

Web Title: Vaccination awareness in tribal dialect in Kalvan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.