जनावरांसाठी लसीकरण मोहीम
By admin | Published: September 22, 2016 12:00 AM2016-09-22T00:00:43+5:302016-09-22T00:01:24+5:30
प्रशासनाला जाग : शेतकऱ्यांमध्ये समाधान
ठेंगोडा : ठेंगोडा व परिसरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांसाठी तातडीने लसीकरण मोहिमेचे
आयोजन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
परिसरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांना खरुजसदृश् रोगाची लागण झाल्यामुळे कुत्रे पिसाळण्याची तसेच जनावरांना बाधा होण्याची भीती व्यक्त करत याबाबत पशुसंवर्धन विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध (दि. २०) झाले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी उज्ज्वलसिंह पवार यांनी ठेंगोडा गावातील जनावरांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येत असल्याचे पत्र ग्रामपंचायतीस दिले. या लसीकरणाबाबत ग्रामपंचायतीने गावात दवंडी देऊन शेतकऱ्यांना आपली जनावरे तसेच पाळीव कुत्र्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते.
या शिबिराचे उद्घाटन सरंपच छायाबाई अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शेवाळे, भिका वाघ, मधुकर व्यवहारे आदिंसह किशोर परदेशी, गोविंद महाले आदिंसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या शिबिरात पशुधन अधिकारी डॉ. आर. एन. बढे, डॉ. के. बी. जनकवडे, डॉ. पी.बी. पवार, वनोपचारक नीलेश खैरनार,
भूषण अहिरे यांच्या पथकाने गावातील गाय, म्हैस, घोडा, कुत्रे, कोंबड्या अशा ८० जनावरांवर वंध्यत्व निवारण, गोचिड निर्मूलन, खरूज लसीकरण आदिंवर औषधोपचार केल्याची माहिती डॉ.बढे यांनी दिली.
लसीकरण व उपचार शिबिर सरंपच छायाबाई आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शेवाळे, भिका वाघ, मधुकर व्यवहारे आदिंसह किशोर परदेशी, गोविंद महाले, तुळशिदास शिंदे, भिला परदेशी आदिंसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)