मानोरीसह नळवाडीत लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:49+5:302021-04-30T04:17:49+5:30
नांदूरशिंगोटे उपकेंद्रांतर्गत मानोरी तर चास उपकेंद्रांतर्गत नळवाडी व कासारवाडी येथे लसीकरणाचे आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव ...
नांदूरशिंगोटे उपकेंद्रांतर्गत मानोरी तर चास उपकेंद्रांतर्गत नळवाडी व कासारवाडी येथे लसीकरणाचे आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना आता घराघरात पसरत चालला आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांना लस घेणे आवश्यक आहे. लस ही अत्यंत सुरक्षित असून लसीबद्दल समाजात जो काही गैरसमज पसरला आहे त्यावर विश्वास ठेवू नये. या लसीमुळे जरी कोरोना झाला तर त्याचा जास्त परिणाम होत नाही. याच उद्देशातून मोफत लसीकरण शिबिर घेण्यात येत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव व नितीन म्हस्के यांनी लसीकरण केंद्रास भेट दिली असता सांगितले. यावेळी मानोरी येथे १०० नागरिकांना तर नळवाडी व कासारवाडी येथे १५० अशाप्रकारे २५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले.