नगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरण मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:40 AM2019-11-25T00:40:31+5:302019-11-25T00:41:01+5:30
भगूर नगर परिषदेच्या दवाखान्यात मागील काही दिवसांपासून बंद पडलेली लसीकरण मोहीम नगराध्यक्षा अनिता करंजकर व नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने पूर्ववत सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भगूर : भगूर नगर परिषदेच्या दवाखान्यात मागील काही दिवसांपासून बंद पडलेली लसीकरण मोहीम नगराध्यक्षा अनिता करंजकर व नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने पूर्ववत सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आपल्या बाळाला लस देण्यासाठी पालिका रुग्णालयात आणावे, असे आवाहन भगूर पालिका आरोग्य विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
दर मंगळवारी पालिका रुग्णालयात ही लसीकरण मोहीम राबविली जाते. मागच्या वेळी किमान ६० बालकांना लस देण्यात आली तर आता सुमारे ४० बालकांना लस देण्यात आली आहे. बाहेर खासगी रुग्णालयात जादा किमतीच्या देण्यात येणाऱ्या अनेक लसी या दवाखान्यात विनामूल्य उपलब्ध आहेत. भगूर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अनिता करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, पाणीपुरवठा सभापती आर. डी. साळवे, संजय शिंदे, शिवसेना शहराध्यक्ष विक्र म सोनवणे, प्रमोद घुमरे, श्याम ढगे, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, आरोग्य सेवक शरीफ शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीताराम भोये, आरोग्य सेविका मंगल बागुल, कुष्ठरोग तज्ज्ञ विजय खैरनार, अलका देवगिरे व आरोग्य विभागाने केले आहे.