लसीकरण केंद्र बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:12+5:302021-07-01T04:12:12+5:30
लसीकरण केंद्र बातमी हिरावाडी मनपा शाळेत लसीकरण केंद्र सुरू पंचवटी : प्रभाग क्र. ३ मधील हिरावाडी येथील मनपा शाळेत ...
लसीकरण केंद्र बातमी
हिरावाडी मनपा शाळेत लसीकरण केंद्र सुरू
पंचवटी : प्रभाग क्र. ३ मधील हिरावाडी येथील मनपा शाळेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी १२३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
प्रभागातील नागरिकांची लोकसंख्या लक्षात घेऊन मनपातर्फे हिरावाडीतील मनपा शाळेत लसीकरण केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी नगरसेवक पूनम मोगरे यांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदर लसीकरण केंद्रावर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशा तीन दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे, असे पूनम मोगरे यांनी सांगितले. लसीकरणाच्या १८ ते ४४ वयोगटातील व ४५ वयापुढील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी आधार कार्डासह मनपा शाळेत लसीकरण केंद्रात संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे. येताना मास्क लावून यावे व लसीकरण केंद्रावर फिजिकल डिस्टन्ससह शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिवसेना महानगर संघटक दिगंबर मोगरे यांनी केले आहे. प्रभागातील महिलेचे लसीकरण करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी अनिल परदेशी, प्रकाश कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा चौधरी, मनपाचे डॉ. विजय देवकर, डॉ देवेंद्र धिवरे, व्यवस्थापक मंगेश चव्हाण, डॉ. प्रियंका नेर, शीतल आढाव, दमयंती देशमुख, अलका गावीत उपस्थित होते.